Meeting Maratha Community 
छत्रपती संभाजीनगर

वैद्यकीय प्रवेशावर तातडीने निर्णय घ्या, मराठा समाजातील विद्यार्थी-पालकांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यानंतर मेडिकल प्रवेशासाठी तयारी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये. विद्यार्थ्यी प्रवेशापासून वंचित राहू नयेत यासाठी तात्काळ विशेष बाब, सुपर मेमरी पद्धतीने प्रवेश देत प्रवेशाचा प्रश्‍न सोडवावा अशी मागणी नीटची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी व पालकांनी केली आहे. मराठा समाजातील ‘नीट’ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा होणार का, या विषयावर रविवारी (ता. ८) याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी चर्चासत्र आयोजीत केले होते.

बैठकीत विद्यार्थी व पालकांनी प्रवेशा संदर्भात विविध प्रवेशात मुद्दे मांडले. सरकारने विशेष बाब म्हणून सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश द्यावा. राज्यसरकारने बारा टक्याप्रमाणे सर्व महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंटचा कोटा ताब्यात घेत प्रवेश द्यावेत. राज्य सरकारने मराठा विद्यार्थ्यांना फी मध्ये शंभर टक्के सवलत द्यावी. सरकारने फीस भरविण्याची जबाबदारी घ्यावीत. औरंगाबाद मधील खंडपीठाने सहा नोव्हेंबरला दिलेल्या निर्देशाप्रमाणे ईडब्ल्युएस (EWS) बाबत राज्य सरकारचे म्हणणे न्यायालयात मांडावे.

तसेच निम शासकीय महाविद्यालयात ईडब्ल्युएसच्या जागा शून्य आहे. डीम्ड युनिव्हर्सिटी मध्ये सुद्धा जागा शून्य आहे. केंद्राचे ईडब्ल्यूएस (EWS) प्रमाणपत्र वापरून अनेक विद्यार्थ्यांनी राज्यामध्ये भाग घेतलेला आहे. तेव्हा त्यांना अडचण येऊ शकते. अशा वेळी सरकारने विद्यार्थ्यांना ती श्रेणी एडिट करण्याची मुभा द्यावीत व त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचा संभ्रम दूर करावा अशी मागणीही या चर्चासत्रातून करण्यात आली आहेत. यातील मुद्दे राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.

‘नैराश्य नको, संयम पाळा‘
विनोद पाटील म्हणाले, ईडब्ल्युएस हे वर्गआधारित आहे. तर आरक्षण हे जातीवर आधारलेले आहे. म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कोणत्याही जातीतील पात्र विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतो. परंतु सरकारच्या गलथानपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्वांचे म्हणणे ऐकून घेत कुणीही नैराश्यात न जाता संयम बाळगण्याचे आवाहन केले.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT