Chhatrapati Sambhajinagar sakal
छत्रपती संभाजीनगर

MP Imtiaz Jaleel : अतिउत्साही मंत्र्यांनी बुडविले शहराचे तब्बल सात कोटी

पत्रकार परिषदेत मेट्रो लाईन संदर्भात खुलासा overzealous ministers have sunk many seven crores of city MP Imtiaz Jaleel

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर- संपूर्ण शहरात उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मंजूर असताना नव्याने मंत्री झालेले डॉ. भागवत कराड यांनी शहरात मेट्रो लाईन प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली. यात डीपीआर तयार करण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च करण्यात आले.

मात्र, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने या प्रकल्पाला मान्यता दिली नाही. यामुळे अतिउत्साही मंत्र्यांनी शहरातील नागरिकांचे साडेसात कोटी रुपये बुडविले, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. रविवारी (ता.३०) पत्रकार परिषदेत मेट्रो लाईन संदर्भात खुलासा करताना ते बोलत होते.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी जालना ते नगर नाक्यापर्यंत फ्लाय ओव्हरचा प्रस्ताव तयार करण्यासाठी मंजुरी दिली होती. या प्रस्तावासंदर्भात सर्व प्रक्रियाही पूर्ण झाली होती.

मात्र, डॉ. भागवत कराड यांनी शहरात मेट्रो लाईन प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केली. आणि यासाठी महापालिकेच्या वतीने डीपीआर तयार करायला सुरवात केली. दरम्यान मेट्रो लाईन प्रकल्पाचा डीपीआर तयार होत असताना खासदार इम्तियाज जलील यांनी फेब्रुवारी २०२२ ला डीपीआर कामास स्थगिती देवून नागरिकांच्या प्राथमिकता असलेल्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, असे पत्र स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दिले होते.

मात्र, मेट्रो लाईन प्रकल्पाला मी केंद्राकडून निधी मिळून देईल, असा दावा डॉ.कराड यांनी केला होता. यावर महापालिकेने ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला पाठविला होता. पण प्राधिकरणाने हा प्रस्ताव नाकारत परत पाठवला आहे.

मात्र, मेट्रो लाईन प्रकल्पाला मी केंद्राकडून निधी मिळून देईल, असा दावा डॉ.कराड यांनी केला होता. यावर महापालिकेने ३ हजार ७३७ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला पाठविला होता. पण प्राधिकरणाने हा प्रस्ताव नाकारत परत पाठवला आहे.

आस्तिक कुमार पांडेंवरही निशाणा

प्राधिकरणाने मेट्रो लाईन प्रकल्पाचा प्रस्ताव नाकारल्याने जनतेचे साडेसात कोटी रुपये बुडाले आहे. मंत्री भागवत कराड व तत्कालीन मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी हे पैसे परत करावेत. अन्यथा मी या संदर्भात सेंट्रल अर्बन डेव्हलपमेंट कमिटीकडे तक्रार करणार आहे. तसेच संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार असल्याचेही खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: दुसऱ्या T20I सामन्यातील भारताच्या पराभवानंतर गौतम गंभीरचं सूर्यकुमारसोबत वाजलं? Viral Video मुळे चर्चेला उधाण

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी घेतली मृत डॉक्टर युवतीच्या कुटुंबियांची भेट; ''राजकारण करण्यापेक्षा सर्वांनी एकजुटीने लढा...''

Georai News : बीडच्या गेवराईत रहात्या घरातच युवकाने गळफास घेऊन जीवन संपविले; कारण अस्पष्ट

Parner News : वाळू वाहतुकदारास दंड करणा-या अधिकाऱ्यांकडूनच १५ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल केला जाणार

Akola News : बीपी तपासायला सांगताच घातला गोंधळ, उपचार सुरु असतानाच रुग्णाच्या कुटुंबियांचा डॉक्टरांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT