Exercise 
छत्रपती संभाजीनगर

Video पाहा : हाडांचे प्रसिद्ध तज्ज्ञ डाॅ. काबरा म्हणतात, माईल्ड टू माॅडरेट करा व्यायाम

सुषेन जाधव

औरंगाबाद : कोरोना आणि स्थूलपणा अशा अनुषंगाने विचार केला तर स्थूलपणामुळे गुडघेदुखी, कंबर, हृदयाचे आजार, मानदुखी, डायबीटीज, अर्धांगवायू यासारखे आजार वाढू शकतात. यासाठी व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. मात्र, व्यायाम जास्तही नको. ‘माईल्ड टू मॉडरेट’ यानुसार आठवड्यातून चार ते पाच वेळेस तीस मिनिटे व्यायाम करण्याचा सल्ला काबरा हॉस्पिटलचे प्रसिद्ध अस्थिव्यंगरोग तज्ज्ञ डॉ. प्रवीण काबरा यांनी दिला आहे. 

डॉ. काबरा म्हणाले, सध्या बाहेर जाऊन व्यायाम करता येत नाही; मात्र घरी योगा करा. आधीपासून करीत असाल तर करण्याची वेळ वाढवा. लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत खेळणे, साफसफाई करणे, फरशी पुसणे, छतावरची जाळे काढणे, स्वयंपाकात मदत करणे यासारख्या लहान लहान गोष्टीही करा यातून व्यायामासोबतच आनंदही मिळेल.

स्थूलपणा येऊ द्यायचा नसेल तर आपली जी एनर्जी जातेय त्यापेक्षा व्यायाम जास्त हवा. आठवड्यातून पाच वेळेस व्यायाम करीत असाल तर रोगप्रतिकारकशक्ती वाढते. १९९८ च्या हाँगकाँकच्या फ्लूमध्ये जी लोक व्यायाम करत नव्हती किंवा जास्तच करत होती त्यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे अहवालात स्पष्ट झाले. माईल टू मॉडरेट व्यायाम, नियमित आहार आणि सकारात्मक विचार करा. 

योगातज्ज्ञ कानडे म्हणतात घरीही करा आसने
आपण व्यायामासाठी बाहेर जाऊ शकत नसलो तरी घरातही विविध प्रकारची योगासने केल्यास शारीरिक स्वास्थ्य टिकवू शकतो. त्यामुळे रोज योगा करण्याचा सल्ला योगातज्ज्ञ ॲड. अंगद एल. कानडे यांनी दिला. मुख्यत्वेकरून मानसिक संतुलन चांगले राहणे, चिडचिडेपणा न होणे; तसेच सूर्यनमस्कार केल्याने शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया चांगली राहते. पचनसंस्था चांगली राहते. इतकेच नव्हे तर पोटाची वाढलेली चरबी कमी होते. याशिवाय शीर्षासन केल्यानेही मेंदूला चांगल्या पद्धतीने रक्ताचा पुरवठा होतो. निद्रानाशेची समस्या असणाऱ्यांनी हमखास शीर्षासन करावे; मात्र रक्तदाब, हृदयविकार असणाऱ्यांनी शीर्षासन करू नये असेही श्री. कानडे यांनी सांगितले. 

Mild to Moderate Exercise Orthopedic Surgeon Dr. Kabra Advise Aurangabad News CoronaVirus

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIFA Club World Cup च्या फायनलनंतर राडा! चेल्सी - पीएसजीचे खेळाडू अन् कोच भिडले, भरमैदानात धक्काबुक्की; Video तुफान व्हायरल

हायवेवर भरधाव ड्रायव्हिंग, गाडीला शिवसेनेचा झेंडा; भडकलेल्या आस्ताद काळेने सांगितली घटना "गाडीला कट.."

Meta Hiring : मेटा 'या' व्यक्तीला देणार 1670 कोटी रुपये पगार, भारतीय व्यक्तीनेही दाखवली कमाल..

Latest Marathi News Live Updates : विरार रिक्षाचालक मारहाण प्रकरणी मनसेच्या 11 पदाधीकाऱ्यांवर गुन्हा दाखल

गाजलेल्या 'वेड' चित्रपटाचा दुसरा भाग येणार! जिनिलिया देशमुखने सांगितली आतली गोष्ट; नेमकं काय म्हणाली अभिनेत्री?

SCROLL FOR NEXT