Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

सेना-भाजपने लावली वाट, आमचं टार्गेट पाच वर्षांची सत्ता : इम्तियाज जलील 

जगदीश पानसरे

औरंगाबाद : महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपने गेल्या पंचवीस वर्षांत शहराची संपूर्ण वाट लावली आहे, आता सुरू असलेल्या त्यांच्या गलिच्छ राजकारणामुळे त्यांनी देऊ केले, तरी तीन महिन्याचे उपमहापौरपद आमचे ध्येय नाही. आगामी महापालिका निवडणुकीत पूर्ण पाच वर्षांची सत्ता मिळवण्याचे आपले टार्गेट असल्याचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले आहे. 

भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शिवसेना-भाजपच्या अंतर्गत वादातून काही दिवसांपुर्वी राजीनामा दिला. त्यामुळे आता उपमहापौरपदाची निवडणूक होत आहे. एमआयएम उमेदवार देणार का? त्यांची पुढील रणनिती काय असेल? या संदर्भात इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

इम्तियाज म्हणाले, औरंगाबाद महापालिका शिवसेना-भाजपच्या भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे. त्यामुळे फक्त तीन महिन्यांसाठीच्या उपमहापौरपदासाठी एमआयएम कुणापुढे हात पसरणार नाही. आमचे लक्ष्य एप्रिल 2020 मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका जिंकून संपुर्ण पाच वर्ष सत्ता मिळवणे हे आहे. त्यादृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत. 

त्यामुळे उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उमेदवार द्यायचा की नाही? मतदानात सहभागी व्हायचे की नाही? या संदर्भात अद्याप कुठलीच चर्चा किंवा निर्णय घेतलेला नाही. मी दिल्लीत असल्यामुळे नगरसेवक व एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांशी माझे बोलणे झालेले नाही. लवकरच त्यांच्याशी चर्चा करून उपमहापौरपदाच्या निवडणुकीत काय भूमिका घ्यायची हे ठरवू, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT