Untitled.png 
छत्रपती संभाजीनगर

खडसेंनी शिवसेनेत यावे, सेनेच्या 'या' मंत्र्यांनी दिली ऑफर !

प्रकाश बनकर

औरंगाबाद : एकनाथ खडसे हे भाजपचे बाहुबली नेते आहेत. ते संपणारे नेते नाहीत. ओबीसी समाजाला सोबत घेऊन अन्यायग्रस्त खडसेंनी शिवसेनेत यावे, त्यांना शिवसेनेत निश्चितच चांगले भवितव्य असेल, असे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

औरंगाबाद तालुक्यातील पिसादेवी येथील ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण, विविध विकासकामांचे उद्घाटन शनिवारी झाले. या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व सत्तार एकत्र होते. माझ्याविषयी षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप आज खडसे यांनी केला. हाच धागा पकडून सत्तार म्हणाले, खडसे यांच्यामुळेच भाजप-शिवसेनेची तुटलेली युती पुन्हा जुळली होती. ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होते; मात्र त्यांच्यावर अन्याय झाला. कटप्पाने बाहुबलीला मारले, तसाच काहीसा प्रकार खडसेंबाबत झाला. आता ओबीसी समाजाला सोबत घेऊन खडसेंनी शिवसेनेत यावे. शिवसेनेला खडसेंसारख्या अनुभवी नेत्याची गरज आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करून आम्ही खडसेंना पक्षात आणण्याचा प्रयत्न करू. 

खडसेंची नाराजी दूर करू - दानवे 

एकनाथ खडसे हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. राज्यात भाजप वाढवण्यात त्यांचे योगदान आहे. राजकीयदृष्ट्या काही निर्णय घ्यावे लागतात. त्यात कोणी मागे जाते तर कोणी पुढे जाते. त्यातून एखाद्याला माघार घ्यावी लागली तर ती नाराजी समजू नये. केवळ नाथाभाऊच नाहीत, तर राज्यातील अनेक नेत्यांना प्रसंग पाहून पुढे नेले जाते तसे थांबवलेही जाते. खडसेंत नाराजी असेल, तर ती एकत्र बसून दूर केली जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Court Order : बांगलादेशी महिलांना परत पाठविण्याचे न्यायालयाचे आदेश; सात महिलांचा समावेश; बुधवार पेठेमध्ये करत देहविक्रीचा व्यवसाय!

IND vs SA T20I: हार्दिक पांड्याचे पुनरागमन निश्चित, शुभमन गिलबाबत अनिश्चितता; कधी जाहीर होणार भारताचा ट्वेंटी-२० संघ?

Latest Marathi News Live Update : बीड शहरातील शाहूनगर भागात दगडफेक

Cosmetic Gynecology: कामा रुग्णालयात लवकरच ‘कॉस्मेटिक गायनेकोलॉजी’; देशात सरकारी रुग्णालयात प्रथमच विभाग सुरु होणार

Gold-Silver Price: असं कसं झालं? सोन्या-चांदीचे भाव एवढे का घसरले? जाणून घ्या नवे दर

SCROLL FOR NEXT