1BAMU_1
1BAMU_1 
छत्रपती संभाजीनगर

गोंधळलेल्या परीक्षा विभागामुळे विद्यार्थ्यांची होतेय ससेहोलपट; लॉगीन, नेटवर्क, मॉक टेस्टच्या अडचणी

अतुल पाटील

औरंगाबाद : ऑफलाइन परीक्षा द्यावी तर, ऐन परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळत नाहीत. ऑनलाइन परीक्षा द्यावी तर, समस्यांचा डोंगरच आहे, यात ऑनलाइन पुर्वी मॉक टेस्ट न दिल्यास थेट ऑफलाइन केंद्र गाठावे लागते. तसेच, ऑनलाइन परीक्षेतही लॉगीन, नेटवर्कची दिव्य पार पाडावी लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची प्रचंड ससेहोलपट होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तरच्या परीक्षेला शुक्रवारी (ता. ९) सुरवात झाली. ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटसाठी झगडावे लागत आहे. विद्यार्थी यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठाच्या चकरा मारत आहेत. ऑफलाइनसाठी विद्यार्थ्यांनी विद्यापीठात चौकशी केल्यानंतर एक दिवस आधीपर्यंत ‘नो रेकॉर्ड फाऊंड’ असे मेसेज दिसत होते दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत असताना एमकेसीएल मदतीला आल्याचे एका विद्यार्थीनीने सांगितले.

ऑनलाइन परीक्षेसाठी मॉक टेस्ट आवश्‍यक होती. एक सराव परीक्षा दिली पण जी आवश्‍यक होती त्याची लिंक मिळाली नाही. याबाबत ना मोबाईलवर मेसेज आला ना ई मेल मिळाला. असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या गोंधळामुळे आधल्या दिवशी अनेकांनी ऑनलाइनचा मोड ऑफलाइन केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे सुरवातीला मोठा असलेला ऑनलाइनचा आकडा कमी होत आहे. ऑनलाइनच्या गोंधळानेच ऑफलाइनसाठी गर्दी वाढत आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना अडचणी होत्या. विद्यापीठातर्फे समन्वयक दिले होते, त्यांचे फोन लागत नव्हते तर, काही उचलत नव्हते अश्‍या तक्रारी विद्यार्थ्यांकडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांची संख्याही दुप्पट करण्यात आली आहे.

पावसामुळे पिके हातची गेल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

ऑनलाइनची वाढवली वेळ
ऑनलाइन परीक्षेसाठी सकाळी ९ ते १ आणि दुपारी २ ते ६ अशी वेळ होती मात्र, यात बदल करण्यात आला आहे. ११ ऑक्टोबरपासुन दोन्ही सत्रामध्ये प्रत्येकी दोन तासाची वेळ वाढवण्याचा निर्णय कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे. त्यानुसार पहिले सत्र सकाळी ९ ते ३ आणि दुपारचे सत्र २ ते ८ वाजेदरम्यान होईल. ही वाढलेली वेळ केवळ ऑनलाईन परीक्षेसाठीच असेल, असे परीक्षा विभागाचे उपकुलसचिव गणेश मंझा यांनी कळविले आहे.

ऑनलाईमध्ये अडचण आल्यास..
ऑनलाइन परीक्षा देताना अडचण आल्यास आयटी कॉर्डिनेटरच्या व्हॉटस्ॲप वर माहिती पाठवावी, असे सूचित करण्यात आले होते. आता त्यात सुधारणा करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची माहिती त्वरित सादर व्हावी, त्यासाठी संकेतस्थळावरच सोय करण्यात आली आहे. परीक्षेसाठी लॉगीन करताना अडचण आली तर, तिथेच उपलब्ध करून देण्यात आलेल्या गुगल फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती सादर करावी. ती सादर झाल्यावर त्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT