Court
Court 
छत्रपती संभाजीनगर

चक्क न्यायमूर्तींना केला फोन!!! या आमदाराचे नाव आलंय पुढं

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: कोण कशासाठी काय करेल याचा भरवसा नाही. असाच एक प्रकार गुजरात उच्च न्यायालयात घडला आहे. त्याचे झाले असे की, गुजरात उच्च न्यायालयात एका प्रकरणातील अटकपूर्व जामिन अर्जावर सुनावणी सुरु होण्यास काही वेळ उरला असतानाच न्यायमूर्तींना एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन व मेसेज आल्याचे प्रकार घडला आहे. न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांना हा फोन आल्याने त्यानंतर दाखल याचिकेत संबंधितांविषयी माहिती घेण्याचे आदेशही गुजरात पोलिसांना देण्यात आले आहेत.

न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांना फोन करणाऱ्या व्यक्तीचे आपण पटेलाद विधानसभा मतदारसंघाचे आमदाराचे नाव असल्याचे समोर आल्याने मात्र एकच गोंधळ उडाला आहे. स्वतःला आमदार म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीने ४५ सेकंदाच्या कॉलमध्ये अटकपूर्व जामिनसंदर्भातील फौजदारी प्रकरण न्यायमूर्तींसमोर सुनावणी लिस्टमध्ये असल्याचे न्यायमूर्तींना सांगितले. त्यावर न्यायमूर्तींनी फोन कट करुनही संबंधित व्यक्तीने पून्हा दोनवेळेस फोन व एकदा मेसेज केल्याचा प्रकार घडला.

अटकपूर्व जामिन अर्जाचे संबंधित प्रकरण सुनावणीस आले असता, न्यायमूर्तींना फोन करणाऱ्या व्यक्तीचे अटकपूर्व जामिन अर्ज केलेल्या अर्जदाराशी काही संबंध आहे का अशी विचारणा न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्याच्या वकीलांना केली. दरम्यान सदर प्रकरणात काही संबंध नसल्याचे निवेदन करण्यात आले. या प्रकरामुळे संबंधित आमदारांनी मात्र आपण न्यायमूर्तींना फोन केल्याच्या प्रकरणावर हात वर केले आहेत. संबंधित फोनचा क्रमांक हा ट्रू कॉलरवर मात्र तौसिफ फैज झेरॉक्स नावाने आढळला आहे. 

ती माहिती घ्या
संबंधित प्रकारानंतर न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी पोलिस अधीक्षकांना यांना मंगळवारी (ता.२३) आदेश दिले की, उच्च न्यायालयाच्या प्रबंधकांकडून संबंधित फोनविषयीच्या कॉल डेटा रेकॉर्ड आधारावर संबंधित आमदार निरंजन पटेल व तौफीक नावाच्या व्यक्तींचा जबाब नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT