sakal
sakal
छत्रपती संभाजीनगर

५३ नवीन चार्टर्ड अकाउंट्सचा खासदार जलील यांच्या हस्ते सत्कार

सकाळ वृत्तसेेवा

औरंगाबाद: आईसीएआयच्या औरंगाबाद शाखा आणि औरंगाबाद विकासातर्फे नव्याने झालेल्या ५३ चार्टर्ड अकाऊंटट्सचा रविवारी (ता.३) खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सातारा परिसरात असलेल्या आईसीएआय भवनात हा कार्यक्रम घेण्यात आला. खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.

औरंगाबादमधून २१ जुलैच्या २०२१ परीक्षेत एकूण ५३ विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून पात्र ठरले, असे औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए पंकज सोनी यांनी सांगितले. खासदार इम्तियाज जलील म्हणाले की, शहरातील प्रत्येक संभाव्य भागात वॉकिंग प्लाझा सारख्या तरुणांच्या मनोरंजनासाठी पुढाकार घेतले जाईल. आपल्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी शैक्षणिक पात्रता हा जीवनातील आणि राजकारणाच्या क्षेत्रात महत्त्वाचा घटक आहे, असे खासदार म्हणाले.

युवा महोत्सवात टॅलेंट सर्च, मिस्टर आणि मिस विकासा, नृत्य, गायन स्पर्धा असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सीए यश जैन आणि सीए यांनी सूत्रसंचालन केले. तर मोहिता पाटील आभार मानले. यावेळी शाखेचे उपाध्यक्ष सीए योगेश अग्रवाल, शाखा सचिव सीए प्रवीण बांगड, शाखा कोषाध्यक्ष सीए गणेश भालेराव, विकास अध्यक्ष सीए रूपाली बोथरा आणि तत्कालीन माजी अध्यक्ष सीए गणेश शिलवंत उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujni Boat Accident: उजनी धरणातील 6 पैकी 5 जणांचे मृतदेह सापडले, नातेवाईकांचा एकच आक्रोश

Pune Rain: पुण्याच्या राजगड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, दुर्गम भागात ओढ्यांना पूर

PM Modi: देवानेच मला पाठवलंय, कारण माझ्यातील शक्ती ही दैवी आहे; पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य

पोर्शे अपघातानंतर धक्कादायक घटना समोर; दोघांना कारखाली चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला 6 महिन्यांनी अटक

Faf Du Plessis : RCBचे ट्रॉफीचे स्वप्न भंगले... पराभवाचं खरं कारण काय? कर्णधार फॅफने 'या' नियमाला धरले जबाबदार

SCROLL FOR NEXT