file photo 
छत्रपती संभाजीनगर

आमदार प्रशांत बंब म्हणाले, कोण चिखलीकर....

प्रकाश बनकर

औरंगाबादः मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नावर आमदार प्रशांत बंब यांच्यातर्फे सर्व पक्षीय लोकप्रतिनिधीची रविवारी (ता.2)औरंगाबादेत बैठक घेण्यात येणार आहे. यासाठी सर्व आमदार,खासदार यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षांना पत्र पाठविण्यात आले आहे.

या बैठकीस नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना निमंत्रण दिले का असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यानंतर आमदार प्रशांत बंब म्हणाले, सॉरी कोण चिखलीकर. खासदार चिखलीकर असे सांगितल्यानंतर बंब यांनी फक्‍त हो म्हणत या विषयी जास्त बोलणे टाळले. 

नांदेड जिल्ह्यात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आमदार प्रशांत बंब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार केली होती. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी याची माहिती होताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना पत्र पाठवून बंब यांच्या तक्रारीची दखल घेऊ नका, असे पत्र देत त्यांच्यावर ब्लॅकमेलिंगचा आरोप केला होता. हे प्रकार राज्यभर चांगलेच गाजले होते. 

या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत पत्रकारांनी बंब यांना " तुम्ही चिखलीकरांना बैठकीसाठी बोलावले का?' असा प्रश्‍न करत छेडले. यावर सॉरी, कोण चिखलीकर असा पावित्रा बंब यांनी घेतला. तुमच्या पक्षाचे खासदार म्हटल्यावर मात्र हो, त्यांनाही बोलावले आहे असे म्हणत बंब यांनी वेळ मारून नेली. 

बंब यांनी आधी राग व्यक्त केला
एकाच पक्षातील या दोन नेत्यांचा हा वाद तेव्हा राज्यपातळीवर चर्चेचा विषय ठरला होता. बंब यांनी आता मराठवाड्याच्या पाणी प्रश्‍नासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना पत्र पाठवून बैठकीस उपस्थित राहण्याचे निमंत्रण धाडत आवाहन केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांनी बंब यांना चिखलीकरांचे नाव घेऊन डिवचले, त्यावर कोण चिखलीकर असे म्हणत बंब यांनी आधी राग व्यक्त केला आणि नंतर स्वःताला सावरत चिखलीकरांनाही पत्र पाठवले असल्याचे सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT