mucormycosis mucormycosis
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेत दिवसभरात म्युकर मायकोसिसने सहा जणांचा मृत्यू

म्युकर मायकोसिसच्या आजाराचे बळी दिवसेंदिवस वाढत आहेत

माधव इतबारे

औरंगाबाद: कोरोना संसर्गाची दुसरी लाट नियंत्रणात येत असताना आत म्युकर मायकोसिस आजाराने डोके वर काढले आहे. बुधवारी (ता. २६) एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सध्या शहरात ४३९ जणांवर उपचार सुरू आहेत.

म्युकर मायकोसिसच्या आजाराचे बळी दिवसेंदिवस वाढत आहेत. या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांवर उपचार करण्यासाठी औषधींचा साठा उपलब्ध करून दिला जात आहे. पण आजारावर नियंत्रण मिळविण्यात यंत्रणेला अपयश आले आहे. त्यामुळे या आजारामुळे मृत्यूची संख्या झपाट्याने वाढत आहे.

म्युकर मायकोसिसमुळे बुधवारी (ता. २६) शहरात सहा जणांचा मृत्यू झाला. घाटी रुग्णालयात चार तर खासगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. या आजाराने शहरात आत्तापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या ६२ एवढी झाली आहे तर सध्या ४३९ रुग्ण सध्या विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. या आजारावर मात करून २०६ जण घरी गेले आहेत, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon In Andaman : मॉन्सूनचे अंदमानात आगमन; महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर कधी धडकणार तारीख आली समोर, प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना

कुलकर्णी ते खैरनार व्हाया वाघमारे! नीटचा पेपर कसा फुटला? लातुरच्या प्राध्यापकाची ९ तास चौकशी

Pune: वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

भाजपच्या युवा नेत्यासह ३ मित्रांचा मृत्यू; लग्नसोहळ्याहून परतताना भीषण अपघात, कारचा चुराडा

नव्या मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं काम लवकरच सुरू होणार, अटल सेतू थेट पुणे रिंगरोडला जोणार; गडकरींनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT