photo 
छत्रपती संभाजीनगर

महावितरणचा डोलारा डळमळीत 

अनिल जमधडे

औरंगाबाद : महावितरणची राज्यभरात प्रचंड म्हणजे ५७ हजार कोटींची थकबाकी झाली असल्यामुळे आणि थकबाकीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण नगण्य असल्याने महावितरणचा डोलारा अक्षरशः कोसळण्याच्या तयारीत आहे. 

महावितरणची राज्यभरातील थकबाकीमध्ये कृषी पंप आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्ट्रीटलाइट, पाणीपुरवठा योजनांची थकबाकी अधिक आहे. ही वसुली होत नसल्यामुळे महावितरण अडचणीत सापडले आहे. 

कृषी पंपाची थकबाकी अधिक

महावितरणची राज्यभर सध्याची थकबाकी ५७,५३५ कोटी इतकी आहे. त्यामध्ये २२ हजार १७५ कोटी केवळ व्याजापोटी थकलेले आहेत, तर ३५ हजार ३५९ कोटी ६६ हजार मूळ थकबाकी आहे. राज्यातील ४१ लाख ६५ हजार शेतकऱ्यांनी ३७,९९६ कोटी रुपये थकवले आहेत. राज्यातील ८२,६९२ कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांनी ४,२१३ कोटी रुपये स्ट्रीट लाईटचे थकलेले आहेत. ६४ कोटी ८३ लाख १९६ घरगुती ग्राहक असून या ग्राहकांनी १५ कोटी ५३ लाख ४३ हजार रुपये थकवले आहेत. तर व्यापारी असलेल्या ६ कोटी ६९ लाख ३६० ग्राहकांनी १७ कोटी ४३ लाख रुपये थकवले आहेत. रेल्वे विभागानेही सात कोटी रुपये थकवले आहेत. 

अनंत अडचणी 

दिवसेंदिवस थकबाकी वाढत असल्यामुळे महावितरण अडचणीत सापडली आहे. मोठ्याप्रमाणावर थकबाकी वसुलीसाठी मोहिमा राबविण्यात येत आहेत. तरीही वसुली मात्र होत नाही. वसुलीचे प्रमाण महिन्यासाठी साधारण केवळ ५ हजार कोटीच्या पुढे जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच प्रचंड थकबाकीची वसुली करताना महावितरणची दमछाक होत आहे. मोठ्या प्रमाणातील थकबाकीने महावितरणला सोयीसुविधा आणि अखंडित वीजपुरवठा करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

National Food : भारताचे राष्ट्रीय जेवण काय आहे? 99 टक्के लोकांना माहिती नाही उत्तर

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

SCROLL FOR NEXT