CoronaVirus 
छत्रपती संभाजीनगर

धक्कादायक: वसुंधरा काॅलनीत २४ तासांनंतर ना सर्व्हे ना तपासणी, केवळ फवारणी

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : आधीच औरंगाबाद रेड झोनमध्ये आहे. एखाद्या परिसरात कोरोनाबाधित आढळल्यानंतर तो कंटेनमेंट झोन जाहीर केला जातो. त्यानुसार तत्काळ कार्यवाही सुरु होते. मात्र, एन- सात मधील वसुंधरा कॉलनीत तसे होताना दिसत नाही. चोवीस तास उलटूनही कॉलनीतील कुणाचीच साधारण आरोग्य तपासणीही करण्यात आलेली नाही.

वसुंधरा कॉलनीत रविवारी (ता. १०) सकाळी एक ५३ वर्षीय पुरुष कोरोनाबाधित आढळले आहेत. शनिवारी रात्री त्यांचे लाळेचे नमुने घेण्यात आले होते. ते पॉझिटिव्ह असल्याचे समजल्यापासून २४ तास उलटले आहेत. वसुंधरा कॉलनी आणि बाजुच्या दोन सोसायटीमध्ये असा  मिळून १०० कुटूंबे याठिकाणी आहेत.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कोरोनाबाधित व्यक्ती आढळून आल्यानंतर काल दुपारी बाराच्या सुमारास औषध फवारणी केली. दुपारी एक वाजता कॉलनी पत्रा लावून सील केली. त्यानंतर मात्र, त्यांच्या संपर्कात कोण कोण आले. याची चौकशी झालेली नाही. किंवा साधारण आरोग्य तपासणी देखील झाली नाही.

सद्यस्थितीत कॉलनीतील काहींना लक्षणे दिसून आहेत. यातील एक जण रात्रीच खासगी रुग्णालयात दाखल झाला आहेत. त्यांचेही अद्याप लाळेचे नमुने घेतलेले नाहीत. महापालिकेतर्फे अद्याप आरोग्याच्या बाबतीत कोणतीही ठोस बाब घडत नसल्याने लोक भयभीत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT