1crime_33 
छत्रपती संभाजीनगर

बलात्कार प्रकरणात चक्रावून टाकणारा खूलासा, महेबूब शेख यांच्याविरुद्ध तांत्रिक पुरावा आढळला नाही!

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादेतील पीडित महिलेच्या चर्चित बलात्कार प्रकरणात चक्रावून टाकणारा खुलासासमोर आला आहे. पीडितेने संशयिताविरुद्ध तक्रार दिली; परंतू तक्रारीनुसार, महेबूब शेख यांच्यासबंधित कोणतेही तांत्रिक पुरावे समोर आले नाहीत. तसेच महेबूब शेख व पीडितेचे टॉवर लोकेशनही एक नसल्याची बाबही समोर आली. या प्रकरणात तीन पथके तपासकार्य करीत आहे व तपासही सहायक पोलिस आयुक्तस्तरावर देण्यात आल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी गुरुवारी (ता.३१) दिली. औरंगाबादेतील सिडको पोलिस ठाण्यात २९ वर्षीय पीडित तरुणीच्या तक्रारीनुसार, मुंबईत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने ट्यूशन घेणाऱ्या शिक्षिका तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याची तक्रार दिली.

यात महेबूब इब्राहिम शेख असे संशयिताचे नाव आहे. याच नावाचे व्यक्ती शिरूर कासार येथे आहे व ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर शिरुर कासार येथील महेबूब शेख यांनी स्वतः फेसबुकवर व्हिडिओ अपलोड करून हा खोटा गुन्हा नोंद केल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यात त्यांनी असे नमुद केले की, ‘‘ज्या महिलेने फिर्याद दिली तिला मी कधीही भेटलेलो नाही. मी तिला कधीही फोन केलेला नाही. फिर्यादीनुसार १० नोव्हेंबरला महेबूब शेख यांच्या फ्लॅटवर भेट झाली असे नमूद आहे परंतु, प्रत्यक्षात मी १० नोव्हेंबरला मुंबईत पक्ष कार्यालय आणि मंत्रालयात होतो. १४ नोव्हेंबरलाही माझ्या गावी होतो. मला महिलांबाबत प्रचंड आदर असून महिलांसोबत चुकीचे कधी वागत नाही. जर या गुन्ह्यात संबंध असला तर मी नार्को टेस्टसाठीही तयार आहे. खोटा गुन्हा नोंदविणारा कोण? याचाही पोलिसांनी शोध घ्यावा.’’ अशी मागणीही महेबूब शेख यांनी व्हिडिओतून केली होती. पोलिसांचा तपासही सुरु आहे. त्यानंतर आता नवीन खुलासा पुढे आला आहे.



उपायुक्त दीपक गिऱ्हे म्हणाले, ‘‘आजपर्यंत झालेल्या तपासामध्ये पीडित महिला व संशयित यांच्या मोबाईलचे एक वर्षापासूनचे कॉल डिटेल पोलिसांनी तपासले. त्यांच्यात संभाषण झाले नाही. त्यांचे मोबाईल एकाच टॉवर खाली कधीही आले नाही. तरीही  या प्रकरणात सर्व पातळीवर कसून तपास करीत आहोत. तपासात तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनूसार, कोणताही तांत्रिक पुरावा समोर आला नाही. पण आम्ही सर्व पातळीवर तपास करीत आहोत.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: केएल राहुलने धोनीलाही जे जमलं नाही, करून दाखवलं; द्रविडने २००२ मध्ये केलेला विक्रम मोडला

Numerology: या ४ तारखांना जन्मलेल्या मुली वडील आणि नवऱ्यासाठी ठरतात समृद्धीचे प्रतीक! तुमच्या घरातही या तारखेला जन्माला आलीये का मुलगी?

आजचे राशिभविष्य - 04 ऑक्टोबर 2026

IND vs WI: भारताविरुद्ध शाय होपच्या नाबाद १६२ धावांनी मोडला ३७ वर्षांचा रेकॉर्ड; रोहित-डिव्हिलियर्सलाही टाकले मागे

IND vs WI,3rd ODI: शाय होपचं दीडशतक अन् वेस्ट इंडिजचा सर्वात मोठा विजय; मात्र भारताने जिंकली मालिका

SCROLL FOR NEXT