Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

विशेष बातमी : औरंगाबाद शहरात होणार आता स्पेशल कोरोना हॉस्पिटल

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्यातली आरोग्य यंत्रणा आता चांगलीच वेगाने पावले उचलू लागली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता सव्वाशेवर गेला असल्यामुळे कोरोनावर इलाज करण्यासाठी स्पेशल कोरोना हॉस्पिटल्स लागणार आहेत. 

औरंगाबाद इथं एक रुग्ण आढळला होता, तेव्हापासून इथेही मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये (मिनी घाटी) आता सोमवारपासून स्पेशल कोरोना हॉस्पिटल केले जाणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मिनी घाटीची पाहणी करून जिल्हा शल्यचिकित्सकांना तशा उपाययोजना तातडीने करण्याचे आदेश गुरुवारी दिले.

सोमवारपासून मिनी घाटीत कोरोना संशयित व बाधितांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शहरातील बहुतांश भागातील खाजगी रुग्णालये बंद असल्यामुळे बदलत्या वातावरणामुळे होणाऱ्या आजारांवर उपचार कुठे करायचे, असा प्रश्न लोकांसमोर उपस्थित झाला आहे. तर रुग्णालये ही अत्यावश्यक सेवा असून शहरातील खाजगी रुग्णालयाने खुली राहू द्या, असे आवाहन आयएमएचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी यांनी केले आहे.

कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्जपणे काम करीत आहेत. तर बदलत्या वातावरणामुळे घराघरात सध्या सर्दी, खोकलाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात कोरोनाचे लक्षणे ही साध्या व्हायरलसारखीच असल्यामुळे लोक दक्षता म्हणून दवाखान्यात जाण्यासाठी बाहेर पडत आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मात्र, घराच्या आसपास असलेले खाजगी रुग्णालये बंद असल्यामुळे उपचारासाठी जायचे कुठे असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. तर सरकारी रुग्णालयात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आढळून येत आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयावर सर्वाधिक ताण पडत असून खाजगी डॉक्टरांनी आपले रुग्णालय सुरू ठेवावे, असे आवाहन आयएमएच्या वतीने करणयात आले आहे.

डॉ. साेमाणी यांनी सांगीतले की, बहूतांश भागात खाजगी दवाखाने सुरू आहेत. अत्यावश्यक सेवा देण्यासाठी सर्व डॉक्टर तयार आहेत. तर काही खाजगी रुग्णालयात काम करणारे कर्मचारी यांना जागोजागी पोलिस आडवित असल्याने काही डॉक्टरांनी रुग्णालये बंद ठेवली असतील.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

मात्र, यासंदर्भात आयएमएच्या वतीने पोलिस आयुक्तांची भेट घेऊन खाजगी रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर्स व अन्य स्टाफला पासेस देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी करणार आहोत. तरीही सर्व खाजगी डॉक्टर्सनी रुग्णालये सुरू ठेवावी. असे आवाहन राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Mira-Bhaynder Morcha: प्रताप सरनाईकांना पाहून मनसैनिकांच्या 50 खोकेच्या घोषणा, मीरा भायंदर मोर्चामधून हाकलले

Jammu Kashmir Schools: उन्हामुळे काश्‍मीरमधील शाळांच्या वेळात बदल

Education News : राज्यभर ८-९ जुलैला शाळा बंद; शिक्षकांचे तीव्र आंदोलन सुरू

"तुम्ही आम्हाला शिकवू नका" महाराष्ट्राला पोसतोय म्हणणाऱ्या खासदार निशिकांत दुबेंना अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर !

Young Author : अवघ्या ११ व्या वर्षी अमायरा चव्हाणने लिहिले ‘द ट्रेल डायरीज’

SCROLL FOR NEXT