Seema Gavit, Kiran Shinde, Renuka Shinde, Kolhapur, 
छत्रपती संभाजीनगर

आता पुढची फाशी कोल्‍हापुरातील या दोन भगिनींना? केला तब्बल ४२ मुलांचा खून

विकास देशमुख

औरंगाबाद - निर्भयाच्या बलात्काऱ्यांनंतर आता पुढची फाशी कोल्‍हापुरातील दोन भगिनींना होण्‍याची शक्‍यता आहे. रेणुका शिंदे आणि सीमा गावीत अशी त्‍यांची नावे आहेत. त्‍यांनी ४२ मुलांचे अपहरण करून त्यांचा खून केल्याचा आरोप होता. त्‍यातील नऊ मुलांची हत्‍या केल्‍याचे सिद्ध झाले. त्‍यामुळे त्‍यांना मृत्युदंड ठोठावण्‍यात आला.

राष्‍ट्रपतींनी त्‍यांची दया याचिका फेटाळलेली आहे. देश स्‍वातंत्र्यानंतर आत्तापर्यंत एकाही महिला गुन्‍हेगाराला मृत्युदंड दिला गेला नाही. त्‍यामुळे यांना जर मृत्युदंड दिला तर या देशातील मृत्युदंड झालेल्या पहिल्या महिला ठरणार आहेत.
 


नेमके काय आहे प्रकरण?

सैतानालाही लाजवेल अशा या क्रूर हत्‍याकांडाची मुख्‍य सूत्रधार रेणुका आणि सीमा यांची आई अंजनाबाई गावीत ही होती. स्वतः आई असलेली ही स्त्री आणि तिच्या दोन मुलीच्‍या मदतीने इतरांच्या बालकांना पळवून नेत होत्‍या. त्‍यानंतर दमदाटी करून किंवा निरागस मुलांकडून भीक मागून घेतले जात होते. एखाद्या मुलाने जर या बाबत कुणाला काही सांगितले तर त्‍याला ठार मारले जात होते. अशा प्रकारे त्‍यांनी ४२ मुलांना ठार केल्‍याचा आरोप होता. पोलिसांकडे त्‍याची त्‍यांनी कबुलीही दिली; पण ४२ पैकी नऊ हत्‍या झाल्‍याचे न्‍यायालयात सिद्ध झाले.

२९ ऑक्‍टोबर १९९६ ला हे बालहत्याकांड उघडकीस आले. यामुळे सारा महाराष्ट्र हादरला होता. सुरवातीला अंजनाबाई एकटीच मुलांना पळवीत असे. नंतर तिने दोन्ही मुलींना त्यात सामील करून घेतले. १९९० च्या सुमारास त्यांनी मुलांना पळवण्यास सुरवात केली. चोरी, पाकीटमारी करण्यासाठी एक ते तेरा वर्षांपर्यंतच्या बालकांना पळवून त्यांचा खून केल्याचे हे प्रकरण आहे. वर्ष १९९७ मध्‍ये अंजनाबाईचा मृत्‍यू झाला. त्‍यामुळे आता रेणुका आणि सीमाच उरल्‍या आहेत.


 
फॅक्ट फाईल 

  • १९९० ते १९९६ या काळात रेणुका, तिचा पती किरण शिंदे, बहीण सीमा आणि आई अंजनाबाई गावीत यांनी ४२ लहान मुलांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप होता. त्यातील नऊ मुलांचा निर्घृण खून करण्यात आल्याचे न्यायालयात सिद्ध झाले.
  • अंजनाबाईचा १७ डिसेंबर १९९७ ला कारागृहात मृत्यू झाला. 
  • किरण शिंदे हा या खटल्यात माफीचा साक्षीदार झाला होता. 
  • रेणुका व सीमा यांच्यावर खटला चालविण्यात आला. 
  • २८ जून २००१ ला कोल्हापूरमधील सेशन कोर्टाने या दोघींना नऊ मुलांचा खून केल्याप्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली. 
  • रेणुका व सीमाने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले.
  • हायकोर्टाने ८ सप्टेंबर २००४ ला सेशन कोर्टाचा फाशीच्या शिक्षेचा निर्णय कायम ठेवला. या निर्णयाला या बहिणींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
  • सुप्रीम कोर्टानेही ३१ ऑगस्ट २००६ ला त्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
  • फाशीची शिक्षा माफ करावी यासाठी त्यांनी केलेला दयेचा अर्ज जुलै २०१४ मध्ये राष्ट्रपतींनी फेटाळल्याने त्यांच्या फाशीवर शिक्कामोर्तब झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं, आंदोलन सुरूच राहणार, सरकारने धोका दिल्यास मुंबई गाठणार

आजचे राशिभविष्य - 17 सप्टेंबर 2026

Nivagrya Recipe: मोदकाची उकड उरलीये म्हणून टेन्शन घेऊ नका! १० मिनिटांत बनवा झटपट 'निवगऱ्या'

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात नव्या कमी दाबाची शक्यता; महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार? हवामान विभागाचा अंदाज

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

SCROLL FOR NEXT