जिल्हा परिषद औरंगाबाद.jpg 
छत्रपती संभाजीनगर

Sakal impact : अखेर जिपमधील आलिशान दालनातून अधिकाऱ्याचा काढता पाय! 

दुर्गादास रणनवरे

औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील महिला सदस्यांसाठी राखीव असलेल्या जागेवर काही महिला पदाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘विश्वासात’ घेऊन आलिशान वातानुकूलित दालनातील त्या अधिकाऱ्याने अखेर तेथून काढता पाय घेतला. अति ‘ऍटिट्यूड’ दाखविणाऱ्या या अधिकाऱ्याने महिला सदस्यांच्या विश्राम ग्रहासाठी राखीव असलेल्या जागेवर डल्ला मारत दालन थाटले होते.

या विषयी ‘सकाळ’मध्ये शुक्रवारी (ता.२०) "महिला भवनच्या जागेवर अधिकाऱ्याचे दालन" या शीर्षकाखाली प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात खळबळ उडाली होती. एका महिला सभापतींनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्या अधिकाऱ्याला आपले बाड बिस्तार गुंडाळून घेण्याची वेळ आल्याची कुजबुज दिवसभर जिल्हा परिषदेत सुरु होती. 

ग्रामीण भागातून जिल्हा परिषदेत सभेसाठी अथवा सर्कल मधील विविध कामांसाठी येणाऱ्या महिला सदस्यांसाठी या ठिकाणी विश्रांतीगृह प्रस्तावित होते. परंतु चमकोगिरी करत वरिष्ठ अधिकारी व काही पदाधिकार्यांची मर्जी सांभाळण्याचा हातखंडा असलेल्या या अधिकाऱ्याने सदस्यांचा विरोध झुगारून या ठीकाणी स्वतः साठी आलिशान दालन तयार करून घेतले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा तसेच दोन महिला सदस्य असूनही महिलांचेच अधिकार हिरावून घेतले जात असल्याच्या या प्रकाराला ‘सकाळ’ने वाचा फोडताच दालनासाठी संमती देणाऱ्यांच्या गोटात खळबळ उडाली होती. तसेच त्या अधिकाऱ्याला दालन त्वरित रिकामे करून पूर्वीच्या अति सामान्य विभागात बसण्याचे वरिष्ठानी सांगितल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. दालनातील आलिशान खुर्ची तसेच दालनावरील नावाची पाटी त्या अधिकाऱ्याने काढून घेत दालन खाली केल्याचेही या सूत्रांनी सांगितले. 

दालनातील साहित्य निघेपर्यंत पाठपुरावा करणार : चव्हाण 
अधिकाऱ्याने दालनातील सर्व साहित्य रिकामे करून कक्ष खाली करावा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे महिला व बाळ कल्याण समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी "सकाळ" शी बोलतांना सांगितले. या प्रकाराला माझा पूर्वीपासूनच विरोध होता आणि राहणार. दालन रिकामे झाल्यानंतर महिला सदस्यांसाठीच त्याचा वापर केला जावा यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

(संपादन-प्रताप अवचार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘NO REFUND, NO EXCHANGE’ बोर्ड लावला म्हणून पैसे परत मिळणार नाहीत? वस्तूमध्ये प्रॉब्लेम आल्यास ग्राहक काय करू शकतो? पाहा

ESIC Medical College : हरिद्वारमध्ये ESIC मेडिकल कॉलेजला मंजुरी; प्रत्येक बॅचमध्ये ५० MBBS विद्यार्थ्यांना प्रवेश

Ladki Bahin Yojana 1800 Viral Claim : लाडकी बहीण योजनेत मिळणार 1800 रुपये? सोशल मीडियावरील 'तो' दावा दिशाभूल करणारा; DGIPR कडून फॅक्टचेक

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Dino Morea: मिठी गैरव्यवहार प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाची 8 तास चौकशी, जबाब नोंदवून सोडलं; चौकशीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT