Aurangabad Crime News
Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

भुताचा धाक दाखवून तो चिमुकलीवर करायचा अत्याचार, एक महिना झाला अन...

सुषेन जाधव

औरंगाबाद: भुताचा धाक दाखवून सहा वर्षीय चिमुकलीवर अत्यावर करणाऱ्या नराधमाला तब्बल महिन्याभरानंतर गजाआड करण्यात उस्मानपूरा पोलिसांना यश आले आहे. आतिष ईश्र्वरसिंग लाहोट (३२) असे त्या आरोपीचे नाव आहे. प्रकरणात सहा वर्षीय पिडितेच्या वडीलांनी तक्रार दिली होती.

तक्रारीनुसार, १७ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पिडितेचे वडील हे घरासमोर उभा होते. त्यावेळी परिसरात राहणारा त्यांचा मित्र त्यांना भेटण्यासाठी आला. त्यावेळी मित्राने सांगितले की, मी १५ एप्रिल रोजी सकाळी सहा साडे सहा वाजेच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बालकनीत उभा असतांना आरोपी आतिष हा पिडिते सोबत अश्लिल चाळे करतांना दिसला. त्यामुळे मित्राने आरोपीला याचा जाब विचारला असता त्याने मला माफ करा यापूढे असे काही करणार नाही असे म्हणाला.

ही सर्व हकीकत ऐकताच पिडितेच्या वडीलांनी पिडितेकडे चौकशी केली असता तीने काही सांगितले नाही. १९ एप्रिल रोजी पिडितेच्या वडीलांसह घरच्यांनी पिडितेकडे घटनेबाबत पुन्हा विश्र्वासात घेत विचारपुस केली असता तीने सांगितले की, काही दिवसांपासून आरोपी हा पिडितेला आपल्या घराच्या ओट्यापाशी घेवुन जात व भुताचा धाक दाखवून पिडितेवर अत्याचार करित, याबाबत कोणाला सांगितले तर तुझ्या वडीलांना मारुन टाकीन अशी धमकी आरोपी पिडितेला देत होता असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. प्रकरणात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा-  व्हिडिओ पाहा : तब्बल सहा लाखांचे रॉमटेरियल जळून खाक

आरोपीला पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता, आरोपीला सोमवापर्यंत (ता.१जून) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आर. कुरेशी यांनी शुक्रवारी (ता.२९) दिले. सुनावणीदरम्यान आरोपीने अशा प्रकारे आणखी गुन्हे केले आहेत का याचा तपास करणे आहे.

गुन्हा करताना आरोपीने छायाचित्रीकरण केले आहे का, तसेच आरोपीने पिडितेवर लैंगिक अत्याचार केले आहेत का याबाबत देखील तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक लोकाभियोक्ता बाळासाहेब महेर यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपीला १ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Final LIVE Score : स्टार्क पाठोपाठ हैदराबादचं 'हेड'ही पडलं; वैभवनं दिला दुसरा धक्का

IPL Final, KKR vs SRH: 'सर्वोत्तम संघच...!', चेन्नईच्या मैदानात भिडण्यापूर्वीच कमिन्स-अय्यरमध्ये रंगलं शाब्दिक युद्ध

Pune Porsche accident : पुणे अपघात प्रकरणात रॅप साँग करणारा आर्यन म्हणतो, मी मिडल क्लास असल्यामुळे...

Rajkot TRP Game Zone Fire: राजकोट गेमिंग झोन प्रकरणी कारवाईला वेग; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल, 2 अटकेत, 4जणांचा शोध

Shreyas Iyer : अय्यरची गिरकी तरी कमिन्सचीच सरशी! टॉसवेळी झाला वेगळाच ड्रामा

SCROLL FOR NEXT