Online offline education 10th and 12th exam Corona closed school for year sakal
छत्रपती संभाजीनगर

ऑनलाइन-ऑफलाइनमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मनविसेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनामुळे वर्षभरापासून शाळा चालू-बंदचा खेळ सुरु आहे. या काळात तांत्रिक अडचणींमुळे बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता आले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पाहिजे तेवढा वेळ मिळालेला नाही. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत विभागीय मंडळाचे सचिव यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले की, कोरोनामुळे २०२१-२२ मध्ये शाळा, कॉलेज बंद होते. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांनी ऑनलाईन सत्र सुरु केले असले तरी, ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणीमुळे शिक्षण घेता आले नाही. मध्यंतरीच्या काळात शाळा, कॉलेज खुली करण्यात आली. त्यावेळी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळा, शिक्षकांमध्ये स्पर्धा चालल्याचे चित्र होते. त्यामुळे काहीच समजले नसल्याचा विद्यार्थ्यांचा सूर आहे.

दरम्यानच्या काळात सुरु करण्यात आलेल्या शाळा ओमिक्रॉनमुळे पुन्हा बंद करुन ऑनलाईन सुरु झाल्या. या ऑनलाईन-ऑफलाईनच्या खेळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यातच बोर्डाने आता दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे जाहीर केले आहे. परीक्षेसाठी विद्यार्थी शैक्षणिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नाहीत. परीक्षांसाठी पुरेसा वेळ अभ्यासासाठी मिळाल्या नसल्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे विभागीय मंडळाला निवेदन दिले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजीव जावळीकर, मंगेश साळवे, प्रतिक गायकवाड, संदीप राजपूत, शुभम नवले, निखील ताकवाले, रितेश देवरे, गजानन गोमटे, प्रद्युम पराये आंदीच्या स्वाक्षरी आहेत.

प्रमुख मागण्या

  • दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यांपर्यंत पुढे ढकलाव्यात,

  • जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये समजला नाही,

  • त्यासाठी प्रत्यक्ष अधिकचे तास घेवून पूर्ण करुन घ्यावा

  • विद्यार्थी हितासाठी शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशकांची नेमणूक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, Test: ध्रुव जुरेलने 'जय जवान, जय किसान' टॅटू का काढला? स्वत:च केला खुलासा; रिषभ पंतच्या दुखापतीवरही दिली अपडेट

सुरुवातीला घाबरली, हातातली राखी पाहताच धावत आली; भावाने बहिण दिलं असं गिफ्ट, सोशल मीडियावर भावूक करणारा VIDEO

Western Railway: टीसी कुठे आहेत, हे आता क्षणार्धात कळणार! जीपीएस स्मार्ट जॅकेटसह पश्चिम रेल्वेचा नवा प्रयोग

Jewali Burglary: जेवळीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! ५ ते ६ घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास; गावात भीतीचे वातावरण

Laxman Hake: आरक्षणावरून पुन्हा रणकंदन; हाकेंचा भुजबळांना थेट सवाल!

SCROLL FOR NEXT