Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाबाधित रुग्णांसाठीच राखीव ठेवा घाटीतील ‘बेड’ 

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून घाटी रुग्णालयात फक्त कोरोनाबाधित रुग्णांवरच उपचार करता यावेत यासाठी येथील ‘बेड’ राखीव ठेवावेत व येथील अन्य आजारांच्या रुग्णांना इतर सरकारी व खासगी रुग्णालयात दाखल करावे, अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी शुक्रवारी (ता.२७) जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले, की चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी कोरोनाबाधित रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच; शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासही मदत झाली. कर्नाटक सरकारने हे चीन मॉडेल वापरण्याचे आदेश आपल्या सरकारी यंत्रणेला दिले आहेत.

यासाठी तेथील मुख्य राज्य रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १७०० ‘बेड’ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच रुग्णालयातील अन्य आजार असलेल्या रुग्णांना इतर खासगी व सरकारी रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांची अधिक चांगल्या पद्धतीने काळजी तर घेता येईल; शिवाय कोरोनाबाधित नसलेल्या रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असे आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे. 

आढळल्या कमतरता 
दरम्यान, आमदार चव्हाण यांनी घाटी रुग्णालयास भेट दिली असता त्यांना त्या ठिकाणी बऱ्या‍च कमतरता दिसून आल्या. घाटी प्रशासनाने अत्यावश्यक वस्तू पुरवण्याची मागणी सरकारकडे केली होती; मात्र अद्यापही या वस्तूंची पूर्तता झाली नसल्याचे घाटी प्रशासनाने यावेळी आमदार चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिले.

आमदार चव्हाण यांनीही त्वरित आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख व या वस्तू पुरवण्याची जबाबदारी ज्या हाफकिन इन्स्टिट्यूटवर आहे त्याचे व्यवस्थापकीय संचालक राजेश देशमुख यांच्याशी फोनवरून संपर्क साधून घाटी प्रशासनाला लागणारे चांगल्या क्वॉलिटीचे मास्क, डॉक्टरांसाठी स्वसंरक्षणात्मक पोशाख आदींसह इतर अत्यावश्यक वस्तूंची त्वरित पूर्तता करण्याची मागणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Volvo Bus: एसटीचा प्रवास आता ‘व्होल्वो’मय! २०० एसी बस ताफ्यात येणार; शयनयान बससह मोबाइलवरून तिकीट बुकिंग

Devgad Fishermen Crisis : जिल्ह्यात मच्छीमारांवरही मंदीचे सावट उलाढालीची चिंता; मासळी घटल्याने इंधन खर्च पाण्यात

Madhya Pradesh: ७,४०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत स्कूटी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप

Marathi News Live Updates : दिल्ली उच्च न्यायालयात सात न्यायिक अधिकाऱ्यांची न्यायाधीशपदी नियुक्ती; मुख्य न्यायाधीशांसमोर शपथ

Jharkhand Plans ₹900 Crore Ayush Hospital: केरळपेक्षा स्वस्त अन् सर्वसामान्यांना परवडणारे आयुष मॉडेल; ९०० कोटींच्या हॉस्पिटलची घोषणा

SCROLL FOR NEXT