Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

गर्भवती लेकीला मिळणार आईच्या मायेची ऊब : आई-वडील जाणार पुण्याला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : पुण्यात असलेल्या गर्भवती मुलीची काळजी घेण्यासाठी पतीव्यतिरिक्त कुणीही नाही. त्यामुळे तिच्याकडे जाण्याची परवानगी औरंगाबादेतील आई-वडिलांनी पोलिस विभागाकडे मागितली. परंतु पोलिसांनी परवानगीच्या अर्जावर प्रतिसाद न दिल्याने त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेत याचिका दाखल केली. 

याचिकेवर तातडीने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेत खंडपीठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी संबंधित दांपत्याला औरंगाबाद ते पुणे असा प्रवास करण्याच्या परवानगीचा अर्ज ग्राह्य धरावा, असे आदेश पोलिस विभागाला दिले आहेत. 

याप्रकरणी औरंगाबाद येथील रहिवासी अनघा जहागीरदार व विजय जहागीरदार यांनी ॲड. पूनम बोडखे पाटील व समीक्षा औटी कुलकर्णी यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली. याचिकेनुसार, जहागीरदार दांपत्याची मुलगी कल्याणी ऊर्फ मृण्मयी देहेडकर या पाच वर्षांपासून पतीसह पुण्यात राहतात. कल्याणीचा गरोदरपणाचा काळ संपलेला आहे. तिची केव्हाही प्रसूती होऊ शकते. पुण्यात त्यांच्यासोबत पतीव्यतिरिक्त काळजी घेणारे अन्य कोणीही नाही. 

अशा परिस्थितीत, मुलीजवळ आई असणे आवश्‍यक आहे. तथापि, लॉकडाउनच्या काळात जिल्हाबंदी असल्याने विजय जहागीरदार यांनी औरंगाबाद ते पुणे असा प्रवास करण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज पोलिस आयुक्त कार्यालयाला ९ एप्रिल रोजी ई-मेलद्वारे केला होता. 

मात्र पोलिस विभागाकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने जहागीरदार दांपत्याने खंडपीठात याचिका दाखल केल्याचे समीक्षा औटी कुलकर्णी यांनी सांगितले. याचिकाकर्त्याने वेळोवेळी विनंती करूनही त्यांच्या अर्जाला प्रतिसाद न दिल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आल्याचे ॲड. समीक्षा म्हणाल्या. 

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तातडीची सुनावणी 

ही याचिका गुरुवारी (ता. १६) सकाळी साडेदहाला खंडपीठात दाखल करण्यात आली. याचिकेवर खंडपीठाने दुपारी अडीच वाजता तातडीची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी घेतली. सुनावणीदरम्यान खंडपीठाने याचिकाकर्ते जहागीरदार दांपत्याने दाखल केलेला औरंगाबाद ते पुणेदरम्यान तत्काळ प्रवास करण्यासाठीचा अर्ज ग्राह्य धरावा, असे आदेश पोलिस विभागाला दिले.

लॉकडाउनच्या काळात प्रवास करण्याच्या परवानगीसाठीची औरंगाबाद खंडपीठातील ही पहिलीच याचिका असल्याचे ॲड. समीक्षा यांनी सांगितले. शासनातर्फे सरकारी वकील डी. आर. काळे व श्रीरंग दंडे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT