CoronaNeel 
छत्रपती संभाजीनगर

रामदेवबाबा संशोधित कोरोनानिलला मान्यतेसाठी खंडपीठात याचिका मात्र.....

सुषेन जाधव

औरंगाबाद: योगगुरू रामदेव बाबा यांनी संशोधित केलेल्या कोरोनिल व इतर औषधांसंबंधी केंद्राच्या आयुष मंत्रालयाकडून स्पष्टता हवी, संबंधित औषधी कोरोना साथीवर आजवर गुणकारी असल्यास गोरगरीब जनतेला कमी खर्चात उपचार मिळेल यानुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल पार्टी इन पर्सन याचिका न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी निकाली काढली. 

अॅड. पुजा दिलीप पाटील (बनकर) यांनी खंडपीठात पार्टी इन पर्सन याचिका दाखल करून कोरोना व्हायरस किट कोरोनिल, श्वसारी व इतर आयुर्वेदीक उत्पादने यासंबंधी केंद्राच्या आयुष मंत्रालयाने चाचणी घेऊन दोन आठवड्यात यासंबंधीच्या वापरासंबंधी स्पष्टता द्यावी. जेणेकरून भारतीमधील गरीब जनतेला लाखोंच्या खर्चापासून वाचविता येईल. 

योगगुरू रामदेव बाबा यांनी तयार केलेले कोरोनिल किट केवळ साडेपाचशे रूपयात उपलब्ध होते. देशात आणि जगात कोरोनाचा कहर आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नागारिक बाधित होत असून मृत्यूही मोठ्या प्रमाणावर होत आहे. आयुर्वेदातील स्वस्त किट मिळाल्यास यावर आळा बसेल. केंद्राच्या आयुष मंत्रालयाने यासंबंधी टेस्ट घेऊन निर्वाळा द्यावा अशी विनंती अॅड. पुजा पाटील बनकर यांनी केली.

केंद्र सरकार व आयुष मंत्रालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल संजीव देशपांडे यांनी यासंबंधीची प्रक्रिया सुरू असल्याचे खंडपीठात सांगितले. केंद्र शासन स्वस्त उपचारासंबंधी पूर्णत: प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी खंडपीठात सांगितल्यामुळे खंडपीठाने याचिका निकाली काढली. राज्याच्या वतीने अॅड. ज्ञानेश्वर काळे पाटील यांनी बाजू मांडली. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू; मोहफुले वेचताना हल्ला, मृतदेह फरकटत नेऊन पायाचे लचके तोडलं अन्..

Malad East Mumbai Accident : मुंबईत पुन्हा एकदा 'खड्डा' ठरला कर्दनकाळ; बांधकाम व्यावसायिकाच्या एका चुकीमुळं 8 वर्षांच्या दिव्यांशचा करुण अंत, चेंडू काढायला गेला अन्...

Ashok Kharat: अन्यथा असे आणखी अशोक खरात उदयास येतील; उत्तर महाराष्ट्रात अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त, संपत्ती लुटली, तरी सरकार निष्क्रिय!

Latest Marathi News Live Update : गंगापूर तालुक्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने रब्बी पिकांचे मोठे नुकसान

Ashok Kharat Case : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर फरार ? रुपाली पाटील यांच्या पोस्टने खळबळ

SCROLL FOR NEXT