Mahabeej 
छत्रपती संभाजीनगर

महाबीजकडून औरंगाबादेत ६४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध

सुषेन जाधव

औरंगाबाद: कधी हवामान बदल, तर कधी पावसाचा खंड यासारख्या संकटामुळे मागील दोन तीन वर्षात परंपरेने घेतल्या जाणाऱ्या नगदी पिकांची शेतकऱ्यांना शाश्वती मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आता तूर उत्पादनाकडे वळले आहेत. यंदाच्या खरिपासाठी परभणी कृषी विद्यापीठाने ६१ क्विंटल बियाणे उपलब्ध केले होते.

ते संपल्यानंतर महाबीजने मंगळवारी ६४ क्विंटल बियाणे उपलब्ध केले. मागील दोन दिवसापूर्वी विद्यापीठांतर्गत असलेल्या बियाणे विक्री केंद्रावरील बियाणे संपले होते, लगोलग महाबीजने बियाणे उपलब्ध करुन दिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

कोरडवाहू क्षेत्रावरही चांगले उत्पादन देणाऱ्या तूरीच्या बीडीएन ७११ या वाणाला औरंगाबाद, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगलीच पसंती देत यंदाच्या खरिपात खरेदी केले आहे. हे वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत कोरडवाहूसाठी खास संशोधित केलेले आहे. मात्र पाच जून रोजी औरंगाबादेतील केंद्रातील या वाणाचे बियाणे संपल्याने शेतकऱ्यांची बियाण्यासाठी मागणी सुरुच होती. 

लाल रंग धोक्याचा की पेरणीचा? 
बीडीएन ७११ या वाणाचा रंग पांढरा आहे, परंतू महाबीजने उपलब्ध करुन दिलेल्या बियाण्याच्या पिशवीवर याच वाणाचा लाल रंग आहे. कोरडवाहूसाठी असलेले वाण म्हणून शेतकरी पसंत करतात खरे, मात्र पांढऱ्या रंगाऐवजी लाल रंग असल्याने नेमके वाण बीडीएन ७११ हेच आहे का याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. याविषयी महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क केला असता, हे वाण पिशवीवर लाल रंग असला तरी बीडीएन ७११ हेच वाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

महाबीजतर्फे देण्यात येणाऱ्या तुरीच्या सर्वच वाणाच्या बियाण्याच्या पिशवीवर लाल रंग आहे, वेगवेगळ्या वाणांसाठी वेगवेगळ्या पिशव्या तयार केल्या जात नाहीत, एकाच पिशवीत लाल, आणि पाढरा रंगाचे तुरीचे बियाणे दिले जात आहे. नुकतेच ६४ क्विंटल दिले असून दोन दिवसात १२० क्विंटल देण्याचा प्रयत्न आहे. 
-शिरीष काळे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज. 

तूरीच्या वाणाच्या रंगाऐवजी संबंधितांशी बोलणार आहे. पिशवीवर जरी तुरीच्या लाल रंगाचा दाण्याचा फोटो असला तरी पिशवीत बीडीएन ७११ हे पांढरे वाण आहे. 
-आनंद गंजेवार, जिल्हा कृषी विकास अधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! CJP च्या दोन मागण्या सरकारकडून मान्य, तिसरीसाठी उद्या पर्यंतची मागितली वेळ, धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?

Maharashtra Dry Day: महाराष्ट्रात २५ जुलैला खरंच 'ड्राय डे' आहे का? आषाढी एकादशीनिमित्त प्रशासनाचा निर्णय काय?

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार

'वास्तू बदललं की नशीब बदलतं?' अन्नू कपूरच्या नव्या चित्रपटात उलगडणार अनोखं सत्य

Paper Leak Bill: मोठी बातमी! पेपरफुटी करणाऱ्यांना १० वर्षांची शिक्षा होणार; मोदी मंत्रिमंडळाची विधेयकाला मंजुरी, तरतुदी काय?

SCROLL FOR NEXT