Waluj MIDC News 
छत्रपती संभाजीनगर

वाळूज एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग, करोडो रुपयांचे नुकसान

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : वाळूज औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) डी सेक्टरमधील प्लाॅट क्रमांक डब्ल्यू 97 येथे उद्योजक अशोक थोरात यांच्या दर्शन ग्रुपची ध्रुवतारा नावाची कंपनी आहे. सहा हजार स्वेअर फुट जागेवर असलेली ही कंपनी चार मजली आहे. या कंपनीत व्हॅराक कंपनीसाठी लागणारे चारचाकी, तीनचाकी व दुचाकी या वाहनासाठी इंडीकेटर, लाईट, वायर असे प्लास्टिकच्या पार्ट्सचे उत्पादन घेतले जाते. बुधवारी (ता.तीन) ही कंपनी सुरू असताना भल्या पहाटे दोन वाजेच्या सुमारास कंपनीच्या मागील बाजूने अचानक आग लागली.

दरम्यान ही घटना कामगारांच्या वेळीच लक्षात आली. यामुळे सर्व कामगारांनी बचावासाठी कंपनी बाहेर धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. मात्र या घटनेत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक एमआयडीसी वाळूज पोलिस आणि महानगरपालिका, गरवारे, बजाज, वाळूज अग्निशमन विभागाला कळताच पोलिस-जवानांनी घटनास्थळी धाव घेत सकाळपर्यंत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून करोडो रूपयांचा कच्चा आणि पक्का माल जळून कोळसा झाल्याचे कंपनी मालक अशोक थोरात यांनी सांगितले आहे.


कामगारांवर उपासमारीची वेळ : ही कंपनी 12 तासाप्रमाणे अशा दोन शिफ्टमध्ये रात्रंदिवस सुरु असते. यात शकडो महिला व पुरुष कामगार काम करतात. या आगीत कंपनी जळून खाक झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
 

पाच बंब घटनास्थळी : या आगीची माहिती वाळूज येथील फायर ब्रिगेडला देण्यात आल्याने फायर ब्रिगेडचे अधिकारी के.ए.डोंगरे, एस.आर.गायकवाड हे बंबासह घटनास्थळी दाखल झाले. बराच वेळ शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा आग आटोक्यात न आल्याने औरंगाबाद महानगरपालिका अग्निशमन दलाचे दोन फायर बंब, गरवारे आणि बजाज कंपनीचे फायर बंब आणि तीन खासगी टँकर मागवण्यात आले.


शर्थीचे प्रयत्न : अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून सुद्धा ही आग सकाळी 11 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.या आगीत करोडो रुपयांचे नुकसान झाले असून ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यावर एकनाथ शिंदे नाराज; परस्पर भेटीचा निर्णय घेतल्याने केली विचारणा

रजत पाटीदार कर्णधार, रिंकू सिंगकडे उप कर्णधारपद; मोठ्या स्पर्धेसाठी जाहीर झाला तगडा संघ... नेमक्या केव्हा होणार या लढती?

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठी बातमी; RBIच्या योजनेने आणले ४०.८१ अब्ज डॉलर; एका निर्णयाने बदललं चित्र

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांचा धाक संपला, गुंडांचा बंदोबस्त करा; अन्यथा...; शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचा इशारा

अयोध्या हादरली! मेडिकल कॉलेजच्या 'एक्स-रे रूम'मध्ये सापडला बॉम्ब बनवण्याचा फॉर्म्युला; तीन जण ताब्यात

SCROLL FOR NEXT