Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

सरकारचा मोठा डाव लोकांसमोर आणणार

अनिल जमधडे

औरंगाबाद : देशातील सार्वजनिक क्षेत्र मल्टिनॅशनल आणि इंटरनॅशनल कंपन्यांना विकण्याचा सरकारचा घाट आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. सरकारचा हा डाव लोकांसमोर आणणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता.27) त्यांनी औरंगाबादेत दिली. 

बामसेफच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रकाश आंबेडकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार, एनसीआर, बेळगाव सीमा प्रश्‍न यासह विविध मुद्यांवर आपले मत मांडले.

ऍड. आंबेडकर म्हणाले, "महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. पाच वर्षे टिकले पाहिजे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. सरकार पाच वर्षे चालवण्याची जबाबदारी तीन पक्षांची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्‍वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. एका वर्षात हे शक्‍य नाही; मात्र पाच वर्षांत त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा,'' असे आवाहन ऍड. आंबेडकर यांनी केले. 

ते म्हणाले, ""मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर भेट झाली तेव्हा एनआरसीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या कायद्यामुळे फक्त मुस्लिमच बाधित होणार असा त्यांचा समज होता; पण या कायद्याचा परिणाम केवळ मुस्लिमांवरच नाही तर देशातील चाळीस टक्के हिंदूंवरदेखील होणार आहे. हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर एनआरसी महाराष्ट्रात आपण लागू करणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले,'' अशी माहिती त्यांनी दिली. 

बेळगाव भारतात आहे हे महत्त्वाचे 

एनआरसीनिमित्त महाराष्ट्र-कर्नाटकातील बेळगावचा प्रश्‍न आणि त्यातून केली जात असलेली वादग्रस्त विधाने या संदर्भात बोलताना आपल्यासाठी सध्या बेळगावचा प्रश्‍न महत्त्वाचा नसल्याचे प्रकाश आंबडेकरांनी सांगितले.

बेळगाव महाराष्ट्रात असले काय किंवा कर्नाटकात? ते भारतात आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. बेळगाव भागाचा दौरा केला तेव्हा असे जाणवले, की काहींच्या मते आम्ही बेळगावात ठीक आहे तर काहींची महाराष्ट्रात सामील व्हावे अशी इच्छा आहे. त्यामुळे तूर्तास हा महत्त्वाचा मुद्दा नाही, असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT