Fertilizer 
छत्रपती संभाजीनगर

शेतकऱ्यांनो, नेवैद्य दाखवल्यासारखे देऊ नका खते, पेरणीसोबतच द्या, ही वापरा पद्धत

सुषेन जाधव

औरंगाबाद: वेळेत पाऊस पडल्याने यंदाच्या खरीपाची चांगली सुरवात झाली आहे. असे असले तरी पीके लागवड करुन काही ठिकाणी २० दिवस तर कुठे १५ दिवस झाले आहेत. या दिवसात शेतकऱ्यांनी कोळपणी व खुरपणीसोबतच रासायनिक खतांची मात्रा द्यायला सुरवात केली आहे.

मात्र बहूतांश शेतकरी रासासनियक, जैविक खते देताना पिकाच्या झाडाजवळ सर्व बाजूंनी गोल टाकत आहेत, नंतर कोळपणीद्वारे झाकले जात आहे. मुळात ही पद्धत चुकीची असून कपाशीसारख्या पिकाला ४० टक्के नत्र, संपूर्ण स्फूरद व पालाश रासायनिक खताची मात्रा लागवडीदरम्यान पेरुन देणं गरजेचे असल्याचे मत केव्हीकेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे यांनी मांडले. 

डॉ. झाडे यांच्या मते, कपाशीच्या उभ्या पिकात फक्त उर्वरित नत्र दोन समान हप्त्यात लागवडीच्या एक महिन्यानंतर व दोन महिन्यानंतर देणे गरजेचे आहे. यामुळे खत व्यवस्थापनाचा अवाजवी खर्च होणार नाही, दिलेल्या खताची मात्रा योग्य प्रमाणात योग्य वेळेस पिकाला उपलब्ध होऊन निव्वळ उत्पन्नात वाढ होईल असेही ते म्हणाले. 

हा गैरसमज काढून टाका

बहूतांश वेळेस पीक लागवड करताना वेळेचे नियोजन नसणे, मजूरांचा अभाव असतो. त्यासोबतच लागवडीसोबत खते पेरल्यानंतर पिकांची उगवण कमी होते, बियाणे अंकूरण कोमेजून जाते हा शेतकऱ्यांचा गैरसमज आहे. वास्तविक अशी परिस्थिती नसते असेही डॉ. झाडे यांनी सांगितले. त्याऐवजी पेरणी करताना खते दिल्यास बियाण्याच्या खाली किंवा बाजूला (तीन ते चार सेंटीमीटर) खत पडते. त्याचा फायदाच होत असतो, कारण पिकाच्या सुरवातीच्या वाढीसाठी (मुळांना) स्फूरद या अन्नद्रव्यची गरज असते.

त्यामुळे जर लागवडीनंतर आणि स्फूरद आणि पालाश उपलब्ध होण्यासाठी ३० दिवसापेक्षा जास्त दिवस लागतात. त्यामुळे लागवडीनंतर जर खत टाकले तर मुळांची वाढ मंदावते, झाडांची मुळेच जर सशक्त नसतील तर झाड जोपासले जात नाही. तसेच नत्र या अन्नद्रव्याची कमतरता असेल तर मुळाची, झाडाची वाढ थांबते, नविन फूट येत नाहीत.  तसेच पिकांमध्ये प्रतिकारक्षमता निर्माण करणाऱ्याचे काम करणारे पालाशही उशिरा दिल्यास पिकांना गरज असते तेव्हा मिळत नसल्याची माहिती शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार यांनी दिली. 

ही पद्धत टाळाच 
कापूस पिकाला १०:२६:२६, २०:२०:००:१३, १८:४६:००, युरीया, १५:१५:१५, १२:३२:१६, सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश यासोबतच काही शेतकरी सिटी कंम्पोस्ट, निबोंळी पेंड किंवा जैविक खत मार्केटमध्ये उपलब्ध असलेले पिकाजवळ हाताने एका ठिकाणी किंवा सर्व बाजुनी गोल टाकतात, नंतर कोळपणीद्वारे खत झाकतात ही पद्धत चुकीची असून पेरणीदरम्यानच खतांची पेरणी करावी असेही आवाहन डॉ. झाडे यांनी केले आहे. मका पिकालाही लागवडीदरम्यानच खते द्यावीत.

युरियाचा अतिरेक वापर टाळावा, युरियाच्या अतिवापरामुळे पिकांची केवळ कायिक वाढ होते, परंतू अपेक्षित उत्पादन मिळत नाही. त्यामुळे जास्त वापर टाळावा.
- डॉ. एस. बी. पवार, सहयोगी संचालक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Year Ender 2025 : वैभव सूर्यवंशीने गाजवले हे वर्ष! अनेक वर्ल्ड रेकॉर्ड, Google Search मध्ये अव्वल अन् राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Crime: फक्त २० रुपयांवरून वाद पेटला, पतीला राग अनावर झाला, आधी पत्नीला संपवलं नंतर..; धक्कादायक कृत्यानं गाव हादरलं

Latest Marathi News Live Update : मावळ केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन, 'मावळ केसरी' किताबासोबतच चांदीची गदा देण्याचा खास मान

शुटिंगदरम्यान जितेंद्र जोशीच्या गळ्याला बसलेला फास, अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगताना म्हणाला... 'स्टूल काढलं अन्...'

Salman Khan Birthday: टायगर, तुमचे प्रेम.... ! सलमानसाठी एक्स गर्लफ्रेंड कतरिनाची वाढदिवसानिमित्त खास पोस्ट

SCROLL FOR NEXT