Aurangabad news
Aurangabad news  
छत्रपती संभाजीनगर

पबजी खेळता खेळता आला हिमाचलचा पोरगा औरंगाबादेत

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : लहान मुलांपासून तरुणांनाही अक्षरशः वेड लावणारा पबजी हा मोबाईल गेम एका मुलाला तब्बल दीड हजार किलोमिटर दूर घेऊन आला आहे. गेमवरील टास्क पूर्ण करण्याच्या नादात हा मुलगा हिमाचल प्रदेशातील सोलन येथून निघून औरंगाबादला पोहोचला आहे. 

या PUBG मोबाईल गेममुळे मुले आपले आ्रस्तित्त्व हरवून अक्षरशः मोबाईल एडिक्ट झाले आहेत. या मनोरुग्ण तरुणाईची संख्या मोठी आहे. अशापैकीच एक मुलगा हिमाचल प्रदेशातील सोलन इथून गायब झाला आणि तब्बल दीड हजार किलोमिटरचे अंतर पार करून महाराष्ट्रात येऊन धडकला. 

आता हा मुलहा सापडला आहे. पण पब्जी गेममध्ये दिलेला टास्क पूर्ण करण्यासाठी तो आपल्या घरापासून इतक्या दूर कसा पोहोचला, याची कथा मोठी सुरस आहे. 

मोबाईल लोकेशनमुळे सापडला मुलगा

मनमा़ड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा मुलगा हिमाचल प्रदेशातल्य़ा सोलन जिल्यातील कुनिहार गावामधून १७ फेब्रुवारीला बेपत्ता झाला होता. त्याच्या कुटुंबाने पोलीसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या तपासात असं लक्षात आलं, की त्या मुलाचं मोबाईल लोकेशन महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये दाखवलं जातंय. 

कुनिहार इथल्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्याची विनंती केली. हा मुलगा मनमाड इथं पोलिसांच्या ताब्यात असल्याचं समजलं आहे. त्याला नेण्यासाठी कुनिहार पोलीस आणि मुलाचे कुटुंबीय निघाले आहेत. आपण कुठे येऊन पोहोचलो, याची त्या मुलाला कल्पनाही नाही, असं पोलिसांनी सांगितलं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT