photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

CoronaVirus : अर्धा दिवस नागरीकांची झुंबड : पण कशासाठी ते वाचा 

अनिलकुमार जमधडे


औरंगाबाद : कोरोनाच्या अनुषंगाने शहरात विविध आयोजन करण्यात येत आहे. पोलिसांतर्फे दुपारी दीड वाजेनंतर लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र यामुळे दुपारी दीड वाजेपर्यंत शहरात सर्वत्र गर्दीचे वातावरण दिसत आहे. या वातावरणामुळे मुळ उद्देश साध्य होत नाही. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची मुळ जबाबदारी ही नागरीकांची आहे. मात्र पोलिसांनी वारंवार सांगूनही अनेक नागरिक गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रभावी अंमलबजावणी

शहरात लॉकडाऊनच्या सुरुवातीला दिवसभर जिवनावश्यक वस्तुंचे दुकाने उघडी असल्याने, शहरात दिवसभर तुरळक वर्दळ दिसून येत होती. मात्र पोलिस प्रशासनाने ही गर्दी रोखण्यासाठी सायंकाळी पाच अकरा या काळात लॉकडाऊनची अधिक प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. त्यानंतर हा वेळ वाढवुन आता दुपारी दिड वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी सुरु केली. दुपारी दीड वाजेच्या नंतर मेडिकल स्टोअर शिवाय एकही दुकान उघडे ठेवले जात नाही. त्यामुळेच अर्धा दिवस प्रचंड गर्दी होत आहे.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्रयोगाने अर्धा दिवस झुंबड

पोलिसांच्या या प्रयोगामुळे दुपारी दिड वाजेपासून रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. असे असले तरीही दुपारी दीड वाजेपर्यंत नागरीकांची किराणा दुकान, दूध डेअरी आणि भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची झुंबड सुरु झाली आहे. यामुळे मुळ उद्देशाला मात्र हरताळ फासला जात आहे. रस्त्यावर गर्दी कमी झाली तर सोशल डिस्टन्सिंगचा प्रश्न आपोआप कमी होतो. त्यामुळे अर्धा दिवस कडकडीत बंद ठेवण्यापेक्षा दिवसभर दुकाने सुरु ठेवल्यास तुरळक लोक खरेदीसाठी दिसले तरीही मुळ उद्देश साध्य होऊ शकतो. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

कारवाईचीही गरज 

शहरात मात्र खरोखरच विनाकारण फिरणाऱ्यांवर दुचाकी जप्त करण्यासारख्या कारवाया वाढवण्याची गरज आहे. नागरीकांवर वचक निर्माण होण्यासाठी पोलिसांचे पथसंचलन करण्याची गरज आहे. पथसंचलन केले तर आणि टवाळखोरांचे वाहने जप्त केले तर पोलिसांची जरब निर्माण होऊ शकते. त्यामुळे पोलिस आयुक्तांनीच भुमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT