latest political News 
छत्रपती संभाजीनगर

'काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून घेणार अन् सरकार पडणार'

'महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नाही'

सकाळ डिजिटल टीम

'महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नाही'

महाराष्ट्रात सध्या राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपाने राज्यसभेसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसने (Congress) बाहेरचा उमेदवार दिल्याने नाराजी आहे. दरम्यान, महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही आलबेल नाही. काँग्रेस पाठिंबा काढणार आणि महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) पडणार, असा दावा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athwale) यांनी केला आहे. (Congress latest political News)

औरंगाबाद येथे बोलत असताना त्यांनी हा दावा केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. ते म्हणाले, महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेस पक्षात सर्वकाही अलेबल नसल्याच चित्र सध्या दिसत आहे. काँग्रेसमध्ये सत्तेतून बाहेर पडण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे. इतकंच नव्हे तर काँग्रेसने पाठिंबा काढला तर अडीच वर्षांसाठी आम्ही सत्ता बनवणार असल्याचेही आठवलेंनी स्पष्ट केलं आहे. (Ramdas Athwale news) आम्ही शिवसेनेला अडीच वर्षाचा फॉर्म्युला दिला होता, पण त्यांनी आम्हाला धोका दिला, असा आरोपही आठवलेंनी केला.

पुढे ते म्हणाले, भाजपचा उमेदवार निवडून येणार असल्याने आम्हाला घोडेबाजार करण्याची गरजच नाही. राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या निवडणुकीत भाजपचाच विजय होणार आहे. भाजपकडे विजयासाठी लागणारे संख्याबळही आहे. सातवा उमेदवार आधी त्यांनी टाकला, आम्ही नाही. मग आम्हालाही निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडीतील अनेक आमदार नाराज असल्याने तेही आम्हाला मतदान करु शकतात आणि सर्व अपक्ष आमदारही आमच्यासोबत आहे, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती यांच्यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, संभाजीराजे छत्रपती यांना भाजपने यापूर्वी संधी दिली होती. पण शिवसेनेने शब्द पाळला नाही. राजे आमच्या सोबत पहिल्यापासून राहिले नाही. राजेंनी सुरवातीपासून अपक्ष राहण्यावर ते ठाम होते. त्यामुळे संभाजीराजेंना भाजपने नक्की काहीतरी दिले असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जस्टिस यशवंत वर्मा प्रकरणात 'एफआयआर'ची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली; कोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Asian Games 2026: १३ वर्षांच्या शाळकरी मुलीनं जिंकलं 'Gold'; भल्याभल्यांना जे नाही जमलं, ते करून दाखवलं

साठी गाठूनही सलमान खान फिट कसा? घरचं जेवण, वर्कआउट अन्... जाणून घ्या भाईजानचा फिटनेस फंडा

‘अपशब्द वापरण्यापेक्षा…’ शशांक केतकर ट्रोलर्सवर भडकला? उत्तर देत म्हणाला...आधी मी काय म्हणतोय ते...'

Marathi News Live Updates: पुण्यात गहाळ झालेली रोकड पोलिसांनी दोन दिवसांत शोधली

SCROLL FOR NEXT