Schools closed Sakal
छत्रपती संभाजीनगर

शाळा, महाविद्यालय बंद निर्णयाचा फेरविचार करावा; आ.सतीश चव्हाण

आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : राज्यात कोविड बाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून विद्यार्थ्यांना परत ‘ऑनलाइन’च्या माध्यमातून शिक्षण घ्यावे (online education)लागत आहे.या निर्णयाचा शासनाने फेरविचार करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण (mla satish chavan)यांनी रविवारी (ता.१६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thakrey) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले की, सरकारने एकीकडे मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह आदी ठिकाणे ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली असताना शाळा, महाविद्यालये सरसकट बंद का? असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. शाळा बंद असल्याने मुले शिक्षणापासून तर दुरावली आहेतच पण त्याच बरोबर त्यांच्या लेखन, वाचन आणि ज्ञानग्रहण क्षमतेवर देखील विपरीत परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. शिक्षणात खंड पडल्याने अनेक मुले शेतात काम करत असून बालविवाह प्रमाण वाढले आहे. कोविड सेंटरसाठी प्रशासनाकडून वसतिगृह(covid care center) ताब्यात घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. वसतिगृह ताब्यात घेण्याच्या विषयाचा देखील शासनाने विचार करावा.

शाळांना वारंवार (school closed)अशा प्रकारचा ‘ब्रेक’ लागत राहिला तर याचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना मुक्त गावे; तर शहरातील कोरोनामुक्त हद्दीतील शाळा, महाविद्यालय ५० टक्के क्षमतेने सुरू करावेत(schools open for 50 percent capacity), अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT