devgiri express google
छत्रपती संभाजीनगर

मोठी बातमी! देवगिरी एक्स्प्रेसवर सशस्त्र दरोडा; प्रवाशांना लुटलंं

या घटनेत प्रवाशांची लुटमार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

या घटनेत प्रवाशांची लुटमार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर ( robbery in devagiri express ) आज पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दौलताबाद-पोटूळ दरम्यान घडली असल्याने प्रवासी घाबरले आहेत. या घटनेत प्रवाशांची लुटमार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवली आणि त्यानंतर रेल्वेत घुसून लुटमार केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर खळबळ उडाली असून वीस दिवसांपूर्वी याच ठिकाणी अशीच रेल्वे अडवून प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आले होते.

घडलेली घटना अशी की, मुंबईहून औरंगाबाद मार्गे नांदेडला निघालेली नंदीग्राम एक्स्प्रेस रेल्वेगाडी शुक्रवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास लासूर स्टेशनकडून औरंगाबादकडे येत होती. यावेळी देवगिरी एक्स्प्रेसवर दौलताबाद-पोटूळ जवळ येण्यापूर्वीच दरोडेखोरांनी सिग्नलवर कपडा बांधून रेल्वे थांबवली. यानंतर चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवत सोन्या-चांदीचे दागिने, मोबाइल हिसकावून घेतला. यावेळी रेल्वेवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याची माहितीही मिळत आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांची तारांबळ उडाली. तात्काळ कोणतीही हालचाल करता आली नसल्याने या दरोडेखोरांनी डाव साधला आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत असून एकाच महिन्यातील ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचे आव्हान असणार आहे. रेल्वेत होणाऱ्या अशी घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षततेचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT