संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

आरटीओचे कामकाज सुरू होणार...पण ही घ्यावी लागेल काळजी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपासून बंद असलेल्या आरटीओ कार्यालयाची सर्व कामे सुरू करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. या आदेशामुळे आरटीओ कार्यालयाचे कामकाज सुरळीत होण्यास मदत होणार आहे. 

आधी दहा टक्केच कर्मचारी
आरटीओत शासकीय नियमानुसार दहा टक्के कर्मचारी काही प्रमाणात काम करत होते. आधीच तुटपुंज्या मनुष्यबळावर कामकाज सुरु होते. त्यात दहा टक्के कर्मचारीच कामावर येत असल्याने नव्वद टक्के कामे खोळंबली होती. त्यामुळे नागरिकही हैराण झाले होते. आता अनलॉकला सुरवात होताच परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी आरटीओचे कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यांना होणाऱ्या आरटीओ शिबिरांचे कामे वगळता अन्य सर्वच कार्यालयीन कामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन परवाना देणे, दुय्यम प्रत देणे; तसेच परवानाविषयक सर्व कामे आणि भरारी पथकाच्या कामकाजाला सुरवात करण्यात येणार आहे. वाहन परवान्यांच्या कामासाठी अपॉइंटमेंट देऊनच कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या संख्येनुसार प्रत्येक कामाचा कोटा निश्चित करण्यात यावा त्यानुसारच काम करावे असे निर्देश देण्यात आलेले आहेत. 

अशा आहेत सूचना
आरटीओ कार्यालयात येणाऱ्या दोन अर्जदारांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे, एका अर्जदाराची चाचणी झाल्यास संगणक की-बोर्ड सॅनिटाईज करून घेण्यात यावेत, अर्जदारास मास्क व हँडग्लोज घालूनच कार्यालयात प्रवेश देण्यात यावा, कार्यालयांमध्ये आणि सॅनिटायझर पुरेशा प्रमाणात साठा करून ठेवण्यात यावे. लॉकडाउनच्या कालावधीपर्यंत शिकाऊ परवाने जारी केलेल्या व मधल्या काळात ज्यांची वैधता संपली आहे अशा परवानाधारकांची पक्क्या परवान्याची कामे प्राधान्याने करावेत, वाहन सॅनिटाइज केल्याची खात्री करावी, पक्क्या परवान्याची चाचणी मोटार ड्राइविंग स्कूलच्या वाहनावर घेतल्यास एका उमेदवारांची चाचणी झाल्यानंतर वाहन सॅनिटाईज करून घेतल्यानंतरच दुसऱ्या उमेदवारांची चाचणी घेण्यात यावी, ज्या अर्जदारांनी सहायक मोटार वाहन पदाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले असल्यास अशा उमेदवारांची शिकाऊ व पक्की कामे प्राधान्याने करण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT