bribe News Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

त्यांनी सापळा लावलाच होता, तोही अलगद अडकला जाळ्यात (वाचा नेमंक काय घडलं)

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड आणि विहीर खोदकामाचा ग्रामसभेचा ठराव देण्यासाठी चार हजारांची लाच स्विकारणाऱ्या कन्नडच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सुधाकर नारायणराव घुले (53, रा. पिशोर, ता. कन्नड) असे त्याचे नाव आहे.

कन्नड तालुक्यात रोजगार हमी योजनेतून फळबाग व विहीर खोदकाम करण्यात आले होते. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी सभा घेतली होती. या ग्रामसभेचा ठराव देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी सुधाकर घुले याने 31 जानेवारीला चार गावांना प्रत्येकी एक हजार रुपये देण्याची मागणी केली. त्यावरुन गावकऱ्यानी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक मारुती पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गणेश धोक्रट, पोलिस नाईक विजय ब्राम्हंदे, सुनील पाटील, विलास चव्हाण, केदार कंदे, कपिल गाडेकर व चांगदेव बागुल यांनी लाच स्विकारताना घुलेला पकडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT