smart buse sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : स्मार्ट बसचे १०० कोटी रस्त्यांसाठी वापरणार

संचालक मंडळाच्या बैठकीत मेंटॉरने दिली अखेर मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : स्मार्ट बससाठी ठेवण्यात आलेली एफडी मोडून १०० कोटी रुपयांचा निधी शहरातील रस्त्यांसाठी वापरण्याचा निर्णय स्मार्ट सिटीने घेतला होता. या निर्णयावर गुरुवारी (ता. २३) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मेंटॉर विनिता वेद-सिंघल यांनी शंभर कोटींचा निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यास मान्यता दिली असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी संचालक मंडळाची वर्षभरानंतर गुरुवारी बैठक झाली. स्मार्ट सिटीच्या मेंटॉर तथा प्रधान सचिव विनिता वेद-सिंघल या ऑनलाइन पद्धतीने बैठकीत सहभागी झाल्या. तसेच स्मार्ट सिटीच्या कार्यालयातून संचालक भास्कर मुंढे, उल्हास गवळी, सिईओ डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त सिईओ अरुण शिंदे बैठकीला उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय देखील ऑनलाइन पद्धतीने बैठकीस हजर होते. बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात डॉ. चौधरी यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीने शहर बस चालविण्यासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला होता. २०२८-२०२९ या वर्षापर्यंत शहर बस चालविण्यासाठी हा निधी होता.

पण सध्या शहर बसच्या माध्यमातून दररोज मिळणारे उत्पन्न देखील फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवले जात आहे. त्यामुळे २०२८-२९ पर्यंत शहरबसाठी आवश्‍यक निधी राखीव ठेऊन उर्वरित निधी रस्ते कामासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याला बैठकीत मंजुरी मिळाली. तसेच वाळूज ते शेंद्रा एमआयडीसी दरम्यान

अखंड उड्डाणपूल व मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन कंपनीने महामेट्रो कार्पोरेशन महामंडळाला वर्कऑर्डर दिली आहे. मेट्रोचा डीपीआर तयार करण्यासाठी लागणार खर्च स्मार्ट सिटीतून करण्यास संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात

आली. मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसह इतर कामांना देखील कार्योत्तर मंजुरी मिळली. संचालक मंडळामध्ये बदल झाला असून जिल्हाधिकारी श्री. पांडेय व महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांना संचालक म्हणून मान्यता देण्यात आली.

सिंघल शहरात येऊन घेणार आढावा

स्मार्ट सिटीमार्फत सध्या अनेक कामे सुरू आहेत. या कामांचा आढावा विनिता वेद-सिंघल या लवकरच छत्रपती संभाजीनगर येथे येऊन स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT