politics  esakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji nagar : सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांना प्रतीक्षा लागलेल्या बाजार समितीची

सात बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला मतदान

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : सर्वच राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांना प्रतीक्षा लागलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.यामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कस लागणार आहे. विधानसभा मतदारसंघ तसेच जिल्ह्यातील राजकारणात बाजार समित्यांना आर्थिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. यामुळे बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून फिल्डिंग लावण्यास सुरुवात होईल.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, लासूर स्टेशन, पैठण, फुलंब्री, वैजापूर, कन्नड या सात बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. २८ एप्रिलला मतदान होणार आहे. २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मतदारांची अंतिम यादीही प्रसिद्ध केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मुकेश बारहाते यांनी बुधवारी (ता.२२) दिली.

स्थानिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारी आणि शेतकऱ्यांशी थेट जोडलेली संस्था म्हणजेच बाजार समिती. या समित्या ताब्यात म्हणजे जिल्हा परिषदेसह निवडणुकीसाठीचे महत्त्वाचे प्रवेशद्वारच आहे.

यामुळे प्रत्येक पक्ष बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी मोठी ताकद लावत असतो. यंदाही राजकीय पक्षांचा बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी कस लागणार आहे. या सात बाजार समितीपैकी सर्वांचे लक्ष हे छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, लासूर, फुलंब्री बाजार समितीवर आहे. या ठिकाणी मोठी टक्कर पाहायला मिळणार आहे.

छत्रपती संभाजीनगरची बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू आहे. दुसरीकडे माजी आमदार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे. कोरोनानंतर अनेक बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक नेमले होते, तर काही बाजार समित्यांच्या संचालकांना मुदतवाढ दिली होती.

अशी होणार निवडणूक

  • २७ मार्च : अर्ज दाखल करण्यास सुरुवात

  • ३ एप्रिल : अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

  • ५ एप्रिल : अर्जांची होणार छाननी

  • ६ एप्रिल : अर्ज मागे घेण्यास सुरुवात

  • २० एप्रिल : अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

  • २१ एप्रिल : अंतिम यादी प्रसिद्ध व निशाणी वाटप

  • २८ एप्रिल : मतदान (तीन दिवसांच्या आत मतमोजणी)

नव्याने निवडणूक झालेल्यांना ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांची सभासदांची नावेही अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याची तपासणी मतदारांनी करावी.

मुकेश बारहाते, जिल्हा उपनिबंधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: जलसाठ्यावर चिंतेचे ढग! सात तलावांत उरले फक्त १७ टक्केच पाणीसाठा शिल्लक

Karnataka Politics : सिद्धरामय्यांची 'ती' एक चूक नडली! डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत शांतपणे कसा उलटवला डाव? वाचा कर्नाटकच्या नेतृत्वबदलाची Inside Story

"तो माजोरडा आहे" सतत होणाऱ्या ट्रोलिंगवर प्रवीण तरडे स्पष्टच बोलले "माझी भाषा अशीच आहे"

IRE vs NZ Test: केन विलियम्सन, टॉम लॅथम यांचा विश्वविक्रम! कसोटीच्या १४९ वर्षांत असे कधी घडलेच नव्हते... ६ पाकिस्तानींवर पडले भारी

Cockroach Janata Party: ''कॉकरोच जनता पार्टी'वर काँग्रेसची नेमकी भूमिका काय? राहुल गांधींचे निकटवर्तीय नेत्याने केली सडकून टीका

SCROLL FOR NEXT