Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनापेक्षाही भयंकर : औरंगाबादेत 'सारी'चे १३७ रुग्ण, ११ मृत्यू 

मनोज साखरे

औरंगाबाद : औरंगाबादसह मराठवाड्यावर सारी (सीव्हियरली अ‍ॅक्यूट रेस्पिरेटरी इलनेस) या आजारानेही थैमान घातले आहे. मागील पंधरा दिवसांत औरंगाबादेत या आजाराने अकरा जणांचा मृत्यू झाल्याचे गुरूवारी (ता. नऊ) समोर आले. तसेच यापूर्वी सारीचे दोन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. आजपर्यंत या आजाराचे जिल्ह्यात एकूण १३७ रूग्ण आढळल्याचे 'सारी'च्या विशेष वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

सारीच्या आजाराची लक्षणे ही कोरोना व्हायरसच्या आजारासारखीच असल्याने आता सारीवर लक्ष केंद्रीत झाले आहे. सारीच्या तपासलेल्या एकूण रूग्णांपैकी दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच ६८ रुग्ण बरे झाले आहेत. सारीचे रूग्णही आढळून येत असून त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयांना सारीच्या रुग्णांचीही माहिती नियमितपणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. 

सारीमुळे दोन आठवड्यांपूर्वी एका आठ वर्षीय बालकाचा मृत्यूही झाला होता. दोन दिवसांपूर्वीच सारीच्या रुग्णांची संख्या ९१ होती. मंगळवारी सहा रुग्ण नव्याने आढळले. तर बुधवारी पुन्हा काही रुग्णांची भर पडुन सारीच्या रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली असल्याचे जिल्हा सामान्य रूग्णालय, घाटी रूग्णालय तसेच खासगी रूग्णालये यांच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.

औरंगाबाद शहरात घाटी रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालयात तसेच नामांकित खासगी रूग्णालयांत सर्व प्रकारच्या उपचाराच्या सुविधा आहेत. त्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील काही जिल्ह्यांतून येथे रूग्ण उपचारासाठी दाखल होत असतात. त्या सर्व रूग्णांतून मागील पंधरा दिवसांत १३७ सारीच्या रूग्णांची नोंद पालिकेला प्राप्‍त झाली असल्याची माहिती फेसबूक लाइव्ह पत्रपरिषदेत महापौरांनी दिली.

खासगी रूग्णालयांत सारीच्या ६२ रूग्णांवर तर घाटी आणि जिल्हा सामान्य रूग्णालयांत ६७ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी दोघांचे अहवाल कोरोना बाधित आढळले. खासगी रूग्णालयांत तीन व घाटी रूग्णालयात आठ एकूण अकरा सारीच्या रूग्णांचा पंधरा दिवसांत मृत्यू झाला.

सारीच्या रूग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (घाटी) कोरोनासाठी स्वतंत्र वार्डची निर्मिती केली. त्यानंतर सारीच्या उपचारासाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्याचा निर्णय घाटी प्रशासनाने घेतला. घाटीतील मानसोपचार रुग्णांसाठी असलेल्या वॉर्डात सारीच्या रुग्णांवर उपचार केले जातील. कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या सीव्हीटीएस विभागातील इमारतीत सारीच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती डॉ. मोहन डोईबळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT