Yash Gangapurkar 
छत्रपती संभाजीनगर

घाटीत‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्याची आत्महत्या, विषारी रसायनाचे केले होते सेवन

मनोज साखरे

औरंगाबाद : घाटी रुग्णालयात ‘एमबीबीएस’च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने विषारी रसायन सेवन करुन आत्महत्या केली. त्याचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी (ता.एक) मध्यरात्रीनंतर मृत्यू झाला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, यश नरसिंगराव गंगापूरकर (२२, मुळ रा. नांदेड, ह. मु. ब्राम्हण गल्ली) असे मृताचे नाव आहे. यश गत दोन वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’चे शिक्षण घेत होता. तो बेगमपुरा भागातील ब्राह्मण गल्लीत बहिण व आईसोबत राहत होता. २५ डिसेंबरला त्याने आई व बहिणीला साबण आणण्यासाठी घराबाहेर पाठवले. त्यानंतर त्याची आई व बहिण घरी येण्यापूर्वी तो घराबाहेर गेला व विषारी रसायन सेवन केले.

त्यानंतर त्याने लगेचच घर गाठले. अचानक उलटी झाल्याने दोघींना संशय आला. त्यांनी यशला तात्काळ घाटीत दाखल केले. उपचारानंतर त्याला गारखेडा परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान, बेगमपुरा पोलिसांनी त्याचा जवाब नोंदविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. शुक्रवारी रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद बेगमपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. तपास जमादार राजकुमार जाधव करीत आहेत.



तो होता मानसिक तणावात
यशने सेवन केलेला विषारी रसायनाचा डोस मोठा होता. त्याच्यावर घाटीत उपचार व एकेक अवयव निकामी होत गेला. त्यानंतर त्याची किडनी निकामी झाली होती. त्यानंतर त्याचा रात्री मृत्यू झाला. काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता. त्याचा कुणाशीही जास्त संपर्क नव्हता अशी माहितीही समोर आली आहे.
 

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीतल्या 'त्या' वाघिणीचा अचानक मृत्यू, काही तांसापूर्वी वनविभागाने केलं होतं बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

मोदी सरकार देणार स्वस्त भाड्याची घरं; शहरात राहणाऱ्यांसाठी मोठी योजना

हिरा ठाकूर यांचा काँग्रेस प्रवेश, भाजपाला मोठा धक्का; राजकीय वर्तुळात खळबळ

MPSC Paper Leak : ‘पुरावा दिल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही’; एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार

Ketan Agarwal Case : केतनचा बाहेरच्या व्यक्तीमार्फत खून घडवून आणण्याचा विचार; पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची माहिती

SCROLL FOR NEXT