women sakal media
छत्रपती संभाजीनगर

'महिलांसाठी स्थापन करा तक्रार निवारण समिती'

मधुकर कांबळे

स्थानिक प्राधिकरणे, शासकीय कंपनी, सहकारी संस्था, खासगी संस्था, सोसायटी, शैक्षणिक संस्था, मॉल, खाजगी कंपनी व इतर कार्यालयात १० किंवा १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असेल अशा प्रत्येक नियोक्त्याने अथवा मालक यांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे गरजेचे आहे.

औरंगाबाद : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाअंतर्गत(Women And Child Development Department) प्रत्येक जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती (Vishakha Committee) गठीत करण्याची तरतूद आहे. ज्या ठिकाणी दहा किंवा त्यापेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी असलेल्या कामाच्या ठिकाणी प्रत्येक तक्रार निवारण समिती स्थापन करावी आणि त्या माहितीचा दर्शनी भागात फलक लावावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार (Deputy Collector Rita Metrevar) यांनी केले आहे. स्थानिक प्राधिकरणे, शासकीय कंपनी, सहकारी संस्था, खासगी संस्था, सोसायटी, शैक्षणिक संस्था, मॉल, खाजगी कंपनी व इतर कार्यालयात १० किंवा १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असेल अशा प्रत्येक नियोक्त्याने अथवा मालक यांनी महिला तक्रार निवारण समिती स्थापन करणे गरजेचे आहे. (Set Up Grievance Committees For Women)

या अधिनियमात नमूद केलेले कार्य पार पाडण्याकरीता प्रत्येक उपजिल्हाधिकारी यांना प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आले आहे. समिती पदाधिकाऱ्यांची संपर्क क्रमांकासह नावे, समिती गठित आदेश तक्रारींचा व वार्षिक गोषवारा आदी माहिती विहित नमुन्यात तत्काळ जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, औरंगाबाद यांच्या कार्यालयाच्या dist.womenc@yahoo.com या मेलवर ३१ मेपर्यंत पाठवावी. तसेच अधिक माहितीसाठी कार्यालयाचा पत्ता प्लॉट नंबर-९, श्री. जाधव यांची इमारत, खोकडपूरा, औरंगाबाद. दुरध्वनी क्रमांक ०२४०-२३२५०६८ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT