Nagar Panchayat Election sakal
छत्रपती संभाजीनगर

वॉर्ड झटला; पण भोपळा नाही फुटला !

शिरूरच्या निकालाचीच सर्वत्र चर्चा, काँग्रेस उमेदवाराला शून्य मत

सकाळ वृत्तसेवा

बीड : मागील काही वर्षांपासून ‘अख्खा गाव झटला, पण पठ्ठ्या जागचा नाही हटला’ अशी नवी राजकीय म्हण प्रचलित झाली आहे. बॅनरवरही फोटोसह या ओळी झळकतात. पण, अख्खा वॉर्ड झटूनही एका पठ्ठ्याच्या मतांच्या आकड्यांचा भोपळाच फुटला नसल्याचे समोर आले आहे.

शिरूर कासार नगर पंचायत(shirur nagar panchayat ) निवडणुकीत काँग्रेस उमेदवार फकीर शब्बीर बाबू यांचा हा निकाल असून, सध्या सोशल मिडीयावर याचीच चर्चा आहे. जिल्ह्यातील शिरूर कासारसह आष्टी, पाटोदा, वडवणी व केज नगर पंचायतींच्या निवडणुकांचे निकाल बुधवारी (ता. २०) जाहीर झाले. तसे जिल्हाभरात धक्कादायक निकाल लागले. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षापेक्षा निकालात भाजप सरस ठरले. निकालानंतर अनेक नेत्यांबाबत ‘दिल्लीत गोंधळ’ अशी स्थिती दिसली. वडवणी व केजमध्ये शिवसेनेच्या १९ पैकी तब्बल १६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त (deposit seal)झाले आहेत.

मात्र, आता एका उमेदवाराचा मतांमध्ये भोपळाच फुटला नसल्याचेही समोर आले आहे. पूर्वीपासून काँग्रेसचे पाईक असलेले ७२ वर्षीय फकीर शब्बीर बाबू काँग्रेस पक्षाकडून शिरूर कासार नगर पंचायतीच्या वॉर्ड क्रमांक सहा मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या वॉर्डात एकूण १९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपच्या गणेश भांडेकर यांनी १५५ मते मिळवून दणदणीत विजय मिळविला. तर राष्ट्रवादीचे उमेदवार शांतिलाल चोरडिया यांना ४३ मतांवर समाधान मानाव लागलं.

सुरवातीला चर्चा रंगली ती श्री. भांडेकर यांनी (nagar panchayat election)भराडीया यांच्यावर शंभराहून अधिक मतांनी मिळविलेल्या विजयाची. पण, निकालाची अधिकृत आकडेवारी आल्यानंतर फकीर शब्बीर बाबू यांच्या पुढे भोपळा (शून्य) होता. मग, त्यांचे स्वत:च मत देखील त्यांना कसे पडले नाही, अशी चर्चा सोशल मिडीयावर रंगली. मात्र, त्यांचे मतदान इतर वॉर्डात आणि त्यांनी नशीब अजमावले इतर वॉर्डात असे समोर आले.(beed news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: राजस्थानमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला इशारा, निवडणुकीवरुन दिला 'हा' अल्टिमेटम

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Marathwada Crime : कडेठाण येथे मुलाने केला पित्याचा खून; प्रेत पुरले घरात; आठ दिवसानंतर घटना उघडकीस!

Theur Crime : पिऊन रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उचलुन बाजुला करण्याकरीता गेलेल्या दोघांना तिघांनी केली मारहाण!

Aadhaar ATM : एटीएम अन् पाकिटही हरवलं? टेन्शन घेऊ नका, लगेच पैसे काढण्यासाठी उपयोगी येईल फक्त आधार नंबर; सोपी आहे प्रोसेस

SCROLL FOR NEXT