Shiv Sena BJP Poster Politics In Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

पाणीपुरवठा योजनेवरुन शिवसेना, भाजप आमने-समाने; औरंगाबादेतील मुख्यमंत्र्यांच्या दौरापूर्वी पोस्टरबाजी

गणेश पिटेकर

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी (ता.१२) औरंगाबाद शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी येत आहेत. एक हजार ८० कोटींची नवीन पाणीपुरवठा योजनेवरुन शिवसेना व भाजपमध्ये पोस्टरबाजी रंगली आहे. शहरात ठिकठिकाणी भाजपने पोस्टर लावून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभाराचे पोस्टर लावले आहेत. फडणवीस यांनी १६८० कोटी रुपये औरंगाबादच्या जलवाहिनीसाठी दिल्याबद्दल आभार मानण्यात आले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांचा दौरा जाहीर झाल्यापासून भाजपने श्रेयाचे राजकारणास सुरवात केली आहे.


मुख्यमंत्र्यांचा दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईहुन औरंगाबादेत दुपारी एक वाजता आगमन होईल. गरवारे स्टेडियमवर दुपारी एक वाजून २० मिनिटांनी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन होईल. सफारी पार्क व औरंगाबादेतील रस्त्यांच्या कामांचे आभासी माध्यमातून भूमिपूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ठाकरे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.  


औरंगाबादकरांची शिवसेनेकडून फसवणूक
आगामी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ केला जात आहे. यातून पुन्हा एकदा औरंगाबादकरांची फसवणूक शिवसेनेकडून केली जात असल्याचा आरोप आमदार अतुल सावे यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhimashankar Devotees Update : महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

आधी शिव्या दिल्या आता 'उत्तम दिग्दर्शक' म्हणत शंशाक केतकरकडून देवस्थळींना शुभेच्छा, पोस्ट होतोय व्हायरल

Social Media Stunt Death : सोशल मीडियाच्या व्यसनाने घेतला जीव, महिलेचा चार वर्षांच्या मुलीसमोरच दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?

Hacking Safety Tips : जर लॅपटॉपमध्ये दिसू लागलेत 'हे' 5 बदल तर समजून जा कुणीतरी केलाय हॅक, सुरक्षित राहण्याची सोपी ट्रिकही पाहा

Mumbai Water Supply: मुंबईत मोठी पाईपलाईन दुरुस्ती; 'या' दिवशी पाणीपुरवठा विस्कळीत राहणार, पण कोणत्या भागात? वाचा यादी...

SCROLL FOR NEXT