Aurangabad News
Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

Video : पाहा, असे मिळतेय शिवभोजन

योगेश पायघन

औरंगाबाद : गरीब, गरजूंना सवलतीच्या दरात जेवण उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजना शहरात सुरू झाली. घाटी, जिल्हा रुग्णालय, बसस्थानक, टीव्ही सेंटर येथे सुरू झाली. चिकलठाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात या योजनेचा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रारंभ झाला.

दहा रुपयात शिवभोजन योजनेला घाटी रुग्णालयात झुणका भाकर केंद्र येथे सुरुवात झाली. 12 वाजता जेवण वाटपाची ऑनलाइन नोंदणी सुरू झाली. दोन वाजेपर्यंत 130 रुग्णांच्या नातेवाईकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला. जेवणात दोन पोळ्या, वरण, भात, बटाट्याची भाजीची गुणवत्ताही चांगली असल्याचे भोजन केलेल्यानी सांगत योजनेचे कौतुक केले.

संचालक राजू व संजय भैरव यांनी ऑनलाइन ऍप नोंदणीची माहिती सांगितली. ते म्हणाले, मोबाईल आणि नाव एवढीच माहिती नातेवाईकाला विचारली जाते. ती माहिती अपवर भरल्यानंतर ऍपच्या साह्याने लोकेशन बेस्ड फोटो घेतल्यावर ऑनलाइन पावती जनरेट होते. त्यानंतर दहा रुपये घेऊन भोजन दिल्या जाते. यासाठी केंद्राचे ठिकाण आणि वेळ, मोबाईल नंबर महत्वाचे असून त्यामुळे बोगस प्रकार टळतील, असे सांगितले.

मात्र घाटीच्या केंद्राला केवळ 150 प्लेटचीच मंजुरी असून, रविवारी तेवढया प्लेट विक्री झाली. त्यामुळे रुग्णालय कामकाज दिवशी हा कोटा पुरणार नाही, असेही मत जाणकारांनी व्यक्त केले. त्यामुळे सोमवारी कार्यालयीन दिवशी शिवभोजन केंद्रावर काय परिस्थिती उद्भवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT