Shop Fire At Jehur District Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : उधार न दिल्याने दुकानालाच लावली आग

सोमनाथ पवार

जेहूर (जि. औरंगाबाद) : येथील बसस्थानकासमोर मुख्य चौकात नीलेश संजय पवार यांचे किराणा दुकान आहे. या दुकानदाराने उधार समान दिले नसल्याने माथेफिरूंनी दुकानाला आग लावल्याची घटना बुधवारी (ता. १५) रात्री घडली. 

चार दिवसांपूर्वी पवार यांच्या दुकानात तीन अनोळखी व्यक्ती दारूच्या नशेत आल्या होत्या. त्यांनी उधार सामान मागितले. पण, पवार यांनी त्यांना नकार दिला. दरम्यान, उधार सामान देत नाही आता पाहून घेऊ, अशी धमकी पवार यांना त्या तिघांनी दिली. त्यानंतर बुधवारी त्यांनी पेटलेले टायर दुकानाजवळ टाकल्याने दुकानाला आग लागली. या आगीत संपूर्ण किराणा सामान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. आगीत गोडतेल, डी फ्रिज, साखरेचे, शेगादाण्यांचे पोते, फर्निचर आदींसह लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले. 

मोठी बातमी - आता पत्रकारांच्या पाठीशी 'गुगल', उचललं 'हे' मोठं पाऊल...
 
अगोदर व्ययसाय ठप्प, त्यात आता नुकसान

कोरोनामुळे अगोदर २० दिवसांपासून व्यवसाय ठप्प आहे. त्यात आता या नव्या संकटामुळे पवार यांचे मोठे नुकसान झाले आहे. गावातील तरूणांनी आग आटोक्यात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण, दुकानात गोडतेल असल्याने आग राहून-राहून भडका घेत असल्याने आग आटोक्यात आणायला बराच वेळ लागला. आग आटोक्यात आली तेव्हा संपूर्ण दुकान जळून खाक झाले.
 

पोलिसांनी केला पंचनामा
तलाठी राम दुधभाते, देवगाव रंगारी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संजय अहिरे, पोलिस नाईक सुदाम साबळे, बीट जमादार बी. बी. खुळे, एस. एच. वाघ, पोलिस पाटील बाळू सावंत यांनी घटनास्थळी येऊन सदर घटनेचा पंचनामा केला. नीलेश पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुदाम साबळे, बी. बी. खुळे करीत आहे. तहसील प्रशाससनाने नीलेश पवार यांना त्यांना तत्काळ मदत करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirav Modi: नीरव मोदीसह इतरांवरील भ्रष्टाचाराचे आरोप रद्द, CBI न्यायालयाचा मोठा निर्णय

मी सेटवरून रडत घरी आलेले... निवेदिता सराफ यांनी सांगितला हिंदी मालिकेचा कटू अनुभव; म्हणाल्या, 'माझ्या आईने मला...'

Monsoon 2026: राज्यासाठी धोक्याची घंटा, यंदा पाऊस कमी होणार.. चिंता वाढली..

Latest Marathi News Live Update : ठाणेकरांवर पाणीसंकट गडद, धरणाच्या पाणीपातळीत घट

Pachod Water Issue : पाणीपुरवठा योजनांचा केवळ फार्स ..! तीन योजना राबवूनही थेरगाव येथे तहान भागविण्यासाठी जिवघेणी कसरत

SCROLL FOR NEXT