Sillod Municipal Council Bypoll 2021 esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad|सिल्लोड पालिका पोटनिवडणुकीत सेनेची बाजी,फुलंब्रीत आघाडी

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे सिल्लोड नगरपरिषदेवर एकहाती वर्चस्व, फुलंब्री नगरपंचायती पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय

नवनाथ इधाटे, सचिन चोबे

फुलंब्री /सिल्लोड (जि.औरंगाबाद) : नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक दोन व वार्ड क्रमांक आठसाठी मंगळवारी (ता. २१) पोटनिवडणूक घेण्यात आली होती. त्याचा निकाल आज बुधवारी (ता.२२) सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीच्या दोन (Aurangabad) उमेदवारांचा विजय झाला आहे. दुसरीकडे सिल्लोड नगरपरिषदेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने (Shiv Sena) बाजी मारली आहे.

फुलंब्री नगरपंचायत पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी विजयी

वार्ड क्रमांक दोनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार पूजा ढोके यांना २७९ मते घेऊन विजयी, तर प्रतिस्पर्धी असलेल्या (Phulambri Municipal Council Bypolls) भाजपच्या विमल ढोके यांना २७७ मते मिळाली. केवळ दोन मताने राष्ट्रवादीच्या पूजा ढोके या विजयी झाल्या आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या संगीता पाबळे यांना ९ मते, तर नोटासाठी ५ मतदान झाले. वार्ड क्रमांक आठमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार अर्चना दुतोंडे यांनी ४३४ मते घेऊन विजयी, भाजपच्या रुपाली बनसोडे यांना केवळ २९०, तर वंचित बहुजन आघाडीच्या पुष्पा मोरे यांना सात मते मिळाली. नोटाला या वार्डात सहा मते मिळाली. (Sillod, Phulambri Municipal Council Bypollls 2021 Shiv Sena, Mahavikas Aghad Win Seats Aurangabad Update)

Phulambri Municipal Council Bypolls 2021

यापूर्वीही या ठिकाणी भाजपचा उमेदवाराचा होता. मात्र झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागा भाजपच्या हातातून गेल्या असून महाविकास आघाडीला या निवडणुकीत यश मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवार व नेते कार्यकर्ते यांनी तहसील आवारातच फटाके फोडून विजयाचा उत्सव साजरा केला. त्याचबरोबर शहरातील मुख्य रस्त्यांवरून फेरी काढून आनंदोत्सव साजरा केला आहे.

सिल्लोड पोटनिवडणुकीत शिवसेनेची बाजी

सिल्लोड नगरपरिषदेच्या (Sillod Municipal Council Bypolls 2021) एका जागेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत अपेक्षेनुसार शिवसेनेने बाजी मारली आहे. राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचे नगरपरिषदेवर एकहाती वर्चस्व असून, मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर, आज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात झालेली मतमोजणीत सुरुवातीपासून शिवसेनेच्या उमेदवार पठाण फातमाबी जब्बार खान आघाडीवर होत्या. त्यांनी एकहाती विजय मिळवित प्रतिस्पर्धी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली. शहरातील प्रभाग क्रमांक १२ च्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, वंचित आघाडी, राष्ट्रवादीसह दोन अपक्ष उमेदवार रिंगणात होते.

शिवसेनेच्या पठाण फातमाबी जब्बार खान यांना २०१९, बहुजन वंचित आघाडीच्या पठाण कैसरबी बनेखा यांना ३८९, भाजपच्या छाया मिसाळ यांना २१०, काँग्रेसच्या शेख जकीयाबी अकबर यांना ५३, राष्ट्रवादीच्या शेख फरीदा बेगम रऊफ यांना २६, अपक्ष शेख आस्मा मुक्तार यांना ७९, तर पठाण रईसाबी चांदखा यांना ९ मते मिळाली. मतमोजणीसाठी उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्वाचन अधिकारी संदीप पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विक्रम राजपूत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक, नगर परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी ए. बी. पठाण, देवेंद्र सूर्यवंशी, राहुल राजपूत, विलास तावडे, विशाल वाघ यांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT