Sister died in an accident while returning from tying rakhi Auragnabad
Sister died in an accident while returning from tying rakhi Auragnabad 
छत्रपती संभाजीनगर

राखी बांधून परतताना बहिणीवर काळाचा घाला

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - दोनशे किलोमीटरवरून औरंगाबादेत येऊन प्रेमाने भावाला राखी बांधली. मात्र, शनिवारी सुटी नसल्याने सकाळी सकाळी राखीपौर्णिमा करून बहीण नांदगाव तालुक्यातील (जि. नाशिक) गावी निघाली. बहिणीला बसस्थानकावर पोहोचविण्यासाठी भाऊ दुचाकीवर निघाला, मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. भरधाव कारने बहीण-भावाच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात बहीण ठार झाली, तर भाऊ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी (ता. ११) सकाळी पावणेअकराच्या सुमारास सलीम अली सरोवराजवळ घडला. संगीता ऊर्फ मंजुषा शिवाजी कासार (४७, रा. हवेली पिंप्री, ता. नांदगाव, जि. नाशिक) असे त्या मृत बहिणीचे नाव आहे, तर गजानन पांडुरंग अन्वेकर (रा. वानखेडेनगर) असे भावाचे नाव आहे.

मृत संगीता यांच्या बहिणीचा औरंगाबादेतील मुलगा सुदर्शन गोरे (२८, रा. हडको कॉर्नर, वानखेडेनगर) याने फिर्याद दिली. त्यानुसार सुदर्शनच्या घराजवळच त्याचे सख्खे मामा गजानन अन्वेकर राहतात. सुदर्शनची मावशी नांदगावहून राखी पौर्णिमेसाठी १० ऑगस्टरोजी गजानन यांच्या घरी आल्या होत्या. दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ ऑगस्टरोजी सकाळी भावाला राखी बांधून त्या नांदगावकडे निघाल्या. दरम्यान भाऊ गजानन हे दुचाकीवर (एमएच २०, एआर ७९०४) बहीण मंजूषा यांना मध्यवर्ती बसस्थानकावर सोडण्यासाठी जात होते. सलीम अली सरोवराजवळ एक्सयूव्ही कारने (एमएच २०, सीएस ०५५५) याने गजानन यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

यात मंजूषा या दुरवर फेकल्या जाऊन बेशुद्ध झाल्या. तर गजानन गंभीर जखमी झाले. दरम्यान गजानन यांनी सुदर्शनला अपघात झाल्याचे कळवत बहिणीसह स्वतः रिक्षाने घाटीत दाखल झाले. दरम्यान दुपारी १२ वाजेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गंभीर जखमी मंजूषा यांना मृत घोषित केले. गजानन यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धडक देणाऱ्या कारचालकाला उपस्थितांनी जागीच धरून ठेवले. ज्ञानेश्वर कारभारी जाधव (३४, रा. घोडेगाव, पो. गोळेगाव, ता. खुलताबाद) असे आरोपी कारचालकाचे नाव आहे. त्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्याविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सुटी नव्हती म्हणून बहीण निघाली

मृत मंजूषा या नांदगाव तालुक्यात आशा वर्कर म्हणून काम पाहतात. त्यांना शनिवारी (ता.१३) सुटी नव्हती. त्यांची लसीकरणासाठी ड्युटी लागल्याने त्यांनी भावासोबत वेळ घालविता यावा यासाठी बुधवारीच रात्री औरंगाबादेत आल्या होत्या. त्यात ही घटना घडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT