Crime
Crime 
छत्रपती संभाजीनगर

महिलेने चिठ्ठी लिहून घेतला गळफास, सहा शेजाऱ्यांना झाली अटक

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: शेजाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून म्हाडा कॉलनीतील ५४ वर्षीय वृद्धेने फॅनला ओढणी अडकवून गळफास लावून आत्हमत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना बेड्या ठोकल्या.

प्रदिप भाउराव रोंगे (४८), गौरव प्रदिप रोंगे (२०), लक्ष्मण मल्हारी पगारे (७३, सर्व रा. बाबा पेट्रोलपंप, म्हाडा कॉलनी), दयानंद हरीभाउ आराख (५३), शुभम दायानंद आराख (२४) व मयुर दयानंद आराख (१९, सर्व रा.एन ४, परिजातनगर) अशी त्या आरोपींची नावे आहेत.

उषा विजय गायकवाड (५४, रा. म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंप परिसर) असे मृत महिलेचे नाव आहे. प्रकरणात मृत उषा गायकवाड यांचे पती विजयकुमार गायकवाड यांनी तक्रार दिली. तक्रारीनुसार, गायकवाड हे जालना येथील रेशीम उद्योग महामंडळातून सेवानिवृत्त झाले असुन सध्या ते औरंगाबादेतील जिल्हा रेशीम कार्यालयात कंत्राटदारामार्फत कार्यरत आहेत. ६ जुलैरोजी उषाबाई यांनी गळफास घेतला. त्यांना बेशुद्धाअवस्थेत घाटीत नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. प्रकरणात क्रांती चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 

चिठ्ठीने लावला तपास 
पोलिसांनी गायकवाड यांच्या घराची झडती घेतली असता घरात उषा यांनी आत्महत्येबाबत लिहलेल्या मजकुराची डायरी पोलिसांच्या हाती लागली. त्यात शेजारी राहणारे प्रदिप उर्फ बालाजी रोंगे, त्याची पत्नी, गौरव रोंगे, भुजंग याची पत्नी, सौरभ भोळे, लक्ष्मण पगारे, दयानंद आरख, त्याची पत्नी, मयुर व शुभम आरख अशा दहा जणांनी आमचे कुटूंब येथे राहू नये यासाठी गायकवाड कुटूंबाला शिवीगाळ करुन धमक्या देत होते. या त्रासाला कंटाळुन आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमुद करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

पोलिस कोठडीत रवानगी 
दरम्यान पोलिसांनी तपास करुन वरील सहा आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले आरोपींना गुरुवारपर्यंत (ता.९) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी.एस. वमने यांनी दिले. सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Latest Marathi News Live Update: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT