3crime_201_163 
छत्रपती संभाजीनगर

दागिने चोरीप्रकरणी सहा दरोडेखोर अटकेत, मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी

सुषेन जाधव

औरंगाबाद : शिवाजीनगरात (कुंभेफळ) दरोडा टाकून दोन लाखांचे दागिने लांबविल्याप्रकरणी करमाड पोलिसांनी सहा दरोडेखोरांना शनिवारी (ता.२) दुपारी बेड्या ठोकल्या. विशेष म्हणजे सहाही दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने फुलंब्री पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक केली होती. त्यावेळी आरोपींनी शिवाजीनगरातील दरोड्याची कबुली दिली. राधेशाम उर्फ राजा रामराव चिखले (३२, रा. परतूर, जालना ह.मु. पुंडलीकनगर), बलवान चैनसिंग पवार (२५), भिमसिंग चैनसिंग पवार (३०, रा. दोघे रा. मुरादपूर ता.जि. गुणा मध्यप्रदेश, ह.मु. वंजारवाडी), राजेश उर्फ भालकर विठ्ठल सोळंकी (२०), हेमराज करणसिंग सोळंकी (१९, दोघे रा.सावंगी तुळजापूर शिवार ता.जि. औरंगाबाद), कृष्णा उर्फ बाळू धोंडीराम दहिवाळ (२५, रा. बाजी उमरद ता.जि. जालना, ह.मु. प्रकाशनगर, रामनगर) अशी दरोडेखोरांची नावे आहेत.

प्रकरणात मंगेश हरिभाऊ झोरे (२६, रा. साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा, ह.मु. शिवाजीनगर कुंभेफळ) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, मंगेश झोरे हे ग्रीव्हज कॉटन कंपनीत तर त्यांचे वडील हरिभाऊ झोरे हे हरमन फार्मा कंपनीत काम करतात. २३ मार्च रोजी पहाटे दरोडेखोरांनी झोरे यांच्या घरात घुसून मंगेश यांच्या आईच्या गळ्याला चाकू लावून सोन्याची पोत व कानातील सोन्याचे पत्‍ते काढुन घेतले. हरिभाऊ झोरे यांना आवाज आल्याने त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार केला, मात्र दरोडेखोरांनी त्यांच्याशी धक्‍काबुक्‍की केली. तसेच कपाटातील सुमारे एक लाख ९३ हजार ५०० रुपयांचे दागिने लांबविले.

दरोडेखोरांनी पळ काढल्यानंतर मंगेश यांच्या आई वडीलांनी त्यांच्या रुमचा दरवाजा उघडला. करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान वरील सहा आरोपींना करमाड पोलिसांनी हर्सुल कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. दरोडेखोरांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता, दरोडेखोरांना पाच जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. एच. जोशी यांनी रविवारी (ता.३) दिले. सुनावणीवेळी सहाय्यक सरकारी वकील सुर्यकांत सोनटक्के यांनी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.

Edited - Ganesh Pitekar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी मुंबईला एकटाच जाणार, २ गाड्या आणि १० लोक सोबत; जरांगेंचा निर्णय, मराठा बांधवांना केलं मोठं आवाहन

जरांगेंनी पुनर्विचार करावा, ऐन गणेशोत्सवात आंदोलन योग्य नाही; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

Pune Mumbai Expressway: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बस घसरली; कामशेत बोगद्याजवळ तिन्ही मार्गिका बंद, ७ ते ८ किमी वाहनांच्या रांगा

INDIA VS WEST INDIES: वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियात मोठे बदल? पंत-जुरेलमध्ये यष्टिरक्षणासाठी रस्सीखेच, राहुल होणार उपकर्णधार?

Marathi News Live Updates : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी गणरायाचे उत्साहात आगमन

SCROLL FOR NEXT