औरंगाबाद : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत औरंगाबाद परिमंडलात आतापर्यंत ५१५० कृषिपंप बसवण्यात आले आहेत.
ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरून त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे.
सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना ३ एचपीसाठी १६ हजार ५६० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थ्यांना ८ हजार २८० रुपये (५ टक्के), तर ५ एचपीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना २४ हजार ७१० रुपये (दहा टक्के) तर अनुसूचित जाती, जमाती गटातील लाभार्थ्यांना १२ हजार ३५५ रुपये (५ टक्के) एवढी रक्कम भरायची होती.
हे ही वाचा - इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...
एजन्सीची निवड
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी औरंगाबाद जिल्ह्यात ३१४६ शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली. त्यापैकी १४२५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत. जालना जिल्ह्यात ६७४३ शेतकऱ्यांनी पैसे भरून एजन्सीची निवड केली. त्यापैकी ३७२५ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसवण्यात आले आहेत.
दिवसा सिंचन शक्य
सौरपंपामुळे दिवसा सिंचन शक्य होणार आहे. यात वीजपुरवठा खंडित होण्याचा, विजेच्या कमी दाबाचा प्रश्नच निर्माण होत नाही. विजेचा किंवा डिझेलचा वापर नसल्यामुळे वीजबिलाचा किंवा डिझेलचा खर्च वाचणार आहे. कमीत कमी देखभालीची गरज आहे. विजेची तार तूटून किंवा पोल पडून विद्युत अपघाताचा धोका नाही. सौरकृषिपंपाचे आयुर्मान 25 वर्षे आहे. सौर कृषिपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे तर सौर पॅनलचा कालावधी दहा वर्षाचा आहे.
हे ही वाचा - मराठवाड्यातील हा किल्ला तुम्हाला माहित नसणारच
विनामूल्य दुरुस्ती
सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती व देखभालीसाठी निश्चित केलेल्या कालावधीत संबंधित एजन्सी विनामूल्य दुरुस्ती करणार आहे. सौर कृषिपंपाचा 5 वर्षासाठी एजन्सीद्वारे विमा उतरवण्यात आलेला आहे. त्यामुळे सौर कृषिपंपाच्या साहित्याची चोरी झाल्यास किंवा नुकसान झाल्यास लाभार्थी विमा कंपनीकडून नुकसानभरपाईसाठी पात्र ठरेल. सौर कृषीपंपासोबत दोन डी.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधाही देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.