Song For Awareness About Coronavirus By Niranjan Bhakre Aurangabad
Song For Awareness About Coronavirus By Niranjan Bhakre Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

मरणाची भीती बसलिया उरी...

प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनाने संपूर्ण जगावर मोठे संकट आहे. याच काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोना विषयी अनेक प्रकारच्या अफवा व उपाय सुचवण्याची प्रकारही मोठ्या प्रमाणावर होत आहे. याच माध्यमांचा वापर लोक कलावंत कोरोना विषयी लोकांनी जागृत करण्यासाठी करीत आहेत. या आजार विरोधात लढण्यास व सरकारने दिलेल्या सूचना विषयी जनजागृती करत आहे. असाच काहीसा प्रयत्न भारूड रत्न निरंजन भाकरे यांनी लोकगीतातून केला आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन आहे. तरीही अनेक जण रस्त्यावर फिरत आहे. यामुळे लोकांनी रस्त्यावर फिरू नये व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेत असे राज्य व केंद्र सरकार तर्फे वेळोवेळी सांगण्यात येत आहे. यात लोककलावंतांतर्फे वेगवेगळ्या गीतांच्या माध्यमातून लोकांना घरी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

भारुडकार निरंजन भाकरे यांनी रहिमाबाद(ता.सिल्लोड) स्वतः घरी राहून कोरोनाविषयी लढा देण्यासाठी जनजागृती पर गीत तयार करत लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे." कोरोना संकट आलेया दारी, मरणाची भीती बसली उरी, साऱ्यांनी मिळून घरात राहायचं शासनाचे नियम पाळत आता घरीच राहायचं' असा संदेश देणारे हे गीत तयार केले आहेत. मुलगा व पत्नी यांची साथ घेऊन भाकरे यांनी हे जनजागृतीपर आवाहन गीत तयार केले आहे. सोशल मीडियावर हे गीत चांगलेच फिरत आहे. बुरगुंडाच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेले भाकरे यांनी या गीताच्या माध्यमातून शासनाची मदत करण्याचे काम ते करीत आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

डॉक्टर नर्स विषयी व्यक्त केली कृतज्ञता 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या डॉक्टर ,नर्स ,पोलीस, अंगणवाडी सेविका यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारूड रत्न निरंजन भाकरे यांनी गीत तयार केले आहेत." साऱ्या डॉक्टर देवतांना परिचारिका मातांना पोलीस देवतांना अंगणवाडीसेविकांना साऱ्या देश सेवकांना मी करितो वंदन' असे या गीताचे बोल आहेत.या गीताच्या माध्यमातून देश विषयी कार्यरत असलेल्या सर्वांविषयी निरंजन भाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni IPL 2024 : 'धोनीला 9व्या क्रमांकावर बॅटिंग करायची असेल तर त्याने खेळू नये...', चेन्नईच्या थालावर भडकला MI चा माजी कप्तान

Latest Marathi News Update : गाझियाबादमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 18 गाड्या घटनास्थळी हजर

Bajrang Punia : नाडाकडून बजरंग पुनिया निलंबित नमुना; चाचणीला नकार,कुस्ती संघटना ‘वाडा’शी संपर्क साधणार

Aerobic Exercise : वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा ‘हे’ एरोबिक व्यायाम प्रकार, मानसिक अन् शारिरीक आरोग्य राहील तंदूरूस्त

Pune News : क्रिकेटच्या चेंडूने घेतला होतकरू खेळाडूचा बळी! अवघड जागी चेंडू लागल्यामुळे ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यु

SCROLL FOR NEXT