Spi Aurangabad news 
छत्रपती संभाजीनगर

"एसपीआय'मधून निवडलेले अधिकारी सांभाळताहेत देशाच्या संरक्षणाची धुरा

प्रकाश बनकर

औरंगाबाद : देशसेवेत जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते, त्यानुसार जो-तो प्रयत्न करीत असतो. देशाचे संरक्षण करणाऱ्या आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या दलांत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून एक अधिकारी असावा, याच उद्देशाने राज्य सरकारने "सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था' (एसपीआय) स्थापन केली. गेल्या 42 वर्षांपासून या तिन्ही दलांमध्ये 518 विद्यार्थी विविध मोठ्या पदांवर कार्यरत असून देशाच्या संरक्षणाची धुरा सांभाळत आहेत. 

सैन्यदलात जाण्याकरीता जिद्द लागते व यापुढेही जाऊन प्राणाची आहुती देण्याची तयारी असलेले युवक या क्षेत्रात येण्याचे स्वप्न बघतात. हे स्वप्न "सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट' (एसपीआय) पूर्ण करीत आहे. राज्यातील नवयुवक जास्तीत जास्त प्रमाणात संरक्षण दलात अधिकारी पदावर रुजू व्हावेत, याच उद्देशाने 1977 मध्ये महाराष्ट्र सरकारने "एसपीआय'ची स्थापना केली. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) स्पर्धात्मक परीक्षा आणि मुलाखत यांची तयारी करून घेण्याच्या दृष्टीने पात्र उमेदवारांसाठी येथे प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत संस्थेने 1800 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. 

"एसपीआय'मध्ये असा होतो प्रवेश 

"एसपीआय'मध्ये प्रवेश करताना अविवाहित व महाराष्ट्राचा रहिवासी असणे, त्याचे वय साधारणतः दहावीच्या माध्यमिक शालांत परीक्षेत बसणारे 17 वर्षे असावे. त्याची शारीरिक पात्रता उंची 157 सें.मी. व वजन 43 किलोग्रॅम असावे. छाती न फुगवता 74 सें.मी. व फुगवून 79 सें.मी. असावी. दृष्टी ः चष्मा लावून जास्तीत जास्त 6/9 तसेच रंगांधळेपणा नसावा. लाल व हिरवा रंग ओळखता आला पाहिजे. यासह सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावा. लेखी परीक्षा आणि मुलाखत पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून एप्रिल किंवा मेमध्ये विविध जिल्ह्यांत विविध सेंटरवर घेण्यात येते. ही परीक्षा मल्टिपल चॉइस क्वेश्‍चन्सवर (प्रश्‍न) आधारित असते. यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येतो. प्रामुख्याने प्रत्येक जिल्ह्यातून अर्ज येईल याची विशेष काळजीही संस्थेतर्फे घेतली जाते. संस्थेत 60 जागांसाठी राज्यभरातून दहा हजार रजिस्ट्रेशन येतात. या विद्यार्थ्यांतून साठ विद्यार्थी निवडून त्यांना एनडीए संरक्षण स्पर्धेत जाण्यासाठी लागणारे शिक्षण देण्यात येते. यासह अकरावी, बारावीचे शिक्षणही करून देण्याची सुविधा संस्थेकडे आहे. 

18 जणांचा स्टाफ 120 विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो

संस्थेविषयी संस्थेचे निवृत्त कर्नल संचालक अमित रा. दळवी म्हणाले, की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यामध्ये 11 ते 21 विविध प्रकारचे स्पेशलायजेशन आहेत. यात केवळ अधिकारीच होत नाही, तर संशोधन, क्रीडा, मानव संसाधन विकास अशा अगणित संधी आहेत. संस्थेच्या दोन छात्रांनी कीर्तिचक्र, एक अशोकचक्र, तीन शौर्यचक्र, 13 सेना / वायू मेडल प्राप्त केलेले आहेत. ही सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था महाराष्ट्र शासन संचालित असल्याने निवास, संघ लोकसेवा आयोगाची तयारी, खेळाची तयारी, ग्रंथालय, मैदानाची तयारी इथे करून घेतली जाते. 18 जणांचा स्टाफ 120 विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो. सध्या संस्थेचे छात्र हे आयएमए आणि एनडीए यामध्ये प्रशिक्षण घेत आहेत. 

9 ब्रिगेडियर समकक्ष संरक्षण क्षेत्रात कार्यरत

काही दिवसांपूर्वी संघ लोकसेवा आयोगाच्या लेखी परीक्षेचा निकाल घोषित झाला. त्यात संस्थेचे 44 विद्यार्थी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना आता सर्व्हिसेस सिलेक्‍शन बोर्ड (एसएसबी) मुलाखतीसाठी भोपाळ, अलाहाबाद, बंगलोर या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. हे विद्यार्थी जून महिन्यात "एनडीए'मध्ये पुढील प्रशिक्षणासाठी रुजू होणार आहेत. "एनडीए'मध्ये सध्या 50 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. इंडियन नेव्हल ऍकॅडमीमध्ये (आयएमए) दोन विद्यार्थी जॉईन झाले आहेत. "एसपीआय'चे सात ब्रिगेडियर कार्यरत आहेत. दोन ब्रिगेडियर निवृत्त झाले आहेत. याच दर्जाचे एअर कमांडर, एक नेव्ही कमांडर, एकूण 9 ब्रिगेडियर समकक्ष संरक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. आठ ग्रुप कॅप्टन एअर फोर्समध्ये आहेत. अठराशे जणांना प्रशिक्षण दिलेल्यांपैकी संरक्षण क्षेत्रात न गेलेले मंत्रालयात, तसेच दोन आयपीएस आहेत. दोन विद्यार्थी केंद्र सरकारच्या परराष्ट्र सेवेत कार्यरत आहेत. काही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचेही कर्नल श्री. दळवी यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Full Speech : मराठी, मुंबई, महाराष्ट्र अन् बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा : राज ठाकरेंचं 25 मिनिटांचं प्रचंड आक्रमक भाषण

Raj Thackeray : ''ठाकरेंची मुलं इंग्रजी मिडियम शिकतात'' म्हणणाऱ्या फडणवीसांना राज ठाकरेंनी सुनावलं; म्हणाले, ''मी हिब्रूत शिकेन पण...''

Latest Maharashtra News Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

SCROLL FOR NEXT