photo 
छत्रपती संभाजीनगर

इस्टमनकलर : बहारदार खानदेशी नाट्य

सुधीर सेवेकर

औरंगाबाद : माणसाचं जीवन एखाद्या फिल्मी रिळासारखं अनेक तुकड्या-तुकड्यांनी बनलेलं असतं. हे तुकडे असतात आपल्या अनुभवांचे, मित्र-मैत्रिणींचे, घटना-प्रसंगांचे. भूतकाळ आणि वर्तमानाचे. अशा रंगीबेरंगी तुकड्यांनी एखाद्या सिनेमासारखं माणसाचं जीवन असतं. म्हणून या आशयाच्या नाटकाचं नाव ठेवलंय ‘इस्टमनकलर.’ (प्रत्यक्षात छायाचित्रण, कॅमेरे, रंगीत चित्र विकसित करणारा शास्त्रज्ञ. उद्योजक कोडॅक इस्टमन याने त्याच्या रंगीत छायाचित्रण तंत्राच्या व्यावसायिक वापरासाठी इस्टमनकलर असं व्यापारी नाव दिलेलं आहे) 

नाटकाची सुरवात

नाटकाची सुरवात चंदा आणि गंगाधर यांच्या लग्नाने होते आहे. चंदा विलक्षण अल्लड, खट्याळ आहे. तर गंगाधर गंभीर. चंदाच्या जीवनात तिच्या चारपाच मित्रांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. या मित्रांची नावेही अनोखी आणि मजेदार आहेत. तिचे हे मित्र किंवा सहकारी हेच चंदाचं विश्‍व आहे. त्यांच्यातच ती खेळते, रमते. ते कायम आपल्याच सोबत आहेत-अगदी लग्न झाल्यानंतरही नव्या घरातही ते आहेत, अशी तिची समजूत असते. 

नाटकाची सुरवात

एखादा माणूस असा त्याच्याच समजुतीच्या जगात वावरू लागला आणि खऱ्या वास्तवाला नाकारू लागला तर त्याला मनोविज्ञानात स्किझोफ्रेनिया असे म्हणतात. स्किझोफ्रेनिया हा विषय अनेक पैलू असलेला, गुंतागुंतीचा आहे. म्हणून तो मनोविज्ञानाच्या दृष्टीने व लेखक, नाटककार, कलाकार यांच्याही दृष्टीने एक आवडीचा विषय असतो. अर्थात प्रस्तुत नाटकात त्याची मनोविज्ञानाच्या दृष्टीने फारशी गंभीर व टेक्‍निकल, क्‍लिनिकल चर्चा न करता लेखकाने हा गंगाधर त्याच्या शांत-संयमी स्वभावाने स्वत:त आवश्‍यक ते बदल घडवून आणण्याच्या लवचिकतेने चंदाला कसे ताळ्यावर आणतो ते मोठ्या खेळकरपणे मांडलेलं आहे. 

भरपूर करमणूक 

या खेळात चंदाचे काम करणाऱ्या श्रद्धा पाटील या मुलीने धमालच केली. जेव्हा जेव्हा ती तिच्या खेड्यातल्या त्या मित्र-सवंगड्यात रमते तेव्हाची त्या सर्वांची खानदेशी भाषा, दंगामस्ती, नाचगाणे हे खूप रिफ्रेशिंग वाटते. त्यात आवश्‍यक ती परिचित हिंदी फिल्मी गाणीही पार्श्‍वसंगीत म्हणून वाजत असतात. तेव्हा प्रेक्षकही ती सगळी धमाल भरपूर एन्जॉय करतात. कारण नाटकाची सगळी मांडणी, हाताळणी स्किझोफ्रेनियाची तांत्रिक व अचूक मनोवैज्ञानिक चर्चा करायची अशी नसून नाट्यरसिकांची भरपूर करमणूक करायची अशीच आहे. आणि त्या दृष्टीने नाटक यशस्वी होतेही. 
 
इस्टमनकलर : लेखक : श्रीपाद देशपांडे, दिग्दर्शक : हेमंत पाटील, नेपथ्य : दिनेश माळी, प्रकाशयोजना : आकाश पाटील, संगीत : हर्षल मोकरे, कलावंत : अभय जोशी, श्रद्धा पाटील, हेमंत प्रकाश, शुभांगी वाडिले, तेजस निंबाळकर, प्रज्ञा बिऱ्हाडे, उमेश चव्हाण, अभिषक सोनार. सादरकर्ते - मुक्‍ती जेग महाविद्यालय, जळगाव. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सकाळी डोळे उघडले, नोकरी गेल्याच्या मेलचे नोटिफिकेशन दिसले; मेटात 8 हजार कर्मचारी कपातीला सुरुवात

Shivraj Motegaonkar Viral Video : पेपर फोडणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्या... शिवराज मोटेगावकरचा जुना व्हिडिओ व्हायरल

Accident: मुंबई-अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, तब्बल ४४९ जणांचा बळी

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये औषध विक्रेत्यांचा मोर्चा

‘जशी स्वामींची इच्छा!’ गश्मीर महाजनी देऊळ बंद 2 मध्ये दिसणार? मोहन जोशी म्हणाले...'सगळे राघव शास्त्रीबद्दल...'

SCROLL FOR NEXT