photo
photo 
छत्रपती संभाजीनगर

घटोत्कच : वेगळी मांडणी 

अनिल जमधडे

औरंगाबाद : काही वर्षे सातत्याने विविध नाट्य स्पर्धांतून अनेकदा बक्षिसे मिळविलेला अभिजित झुंजारराव हा आजचा एक महत्त्वाचा रंगकर्मी आहे. त्यातच त्याने देशात आणि परदेशातूनही लोकप्रिय असलेल्या ‘महाभारत’ या सुप्रसिद्ध महाकाव्यातील एक कथाबीज उचलून त्यावर ‘घटोत्कच’ हे नाटक यंदा आणलेले.आहे.

महाभारत या महाकाव्यात 

साहजिकच रसिकांच्या अपेक्षा खूप उंचावलेल्या. गर्दीही बऱ्यापैकी झालेली. आधुनिक भारतीय रंगभूमीवरील रतन थियाम, गिरीश कार्नाड, सत्यदेव दुबे, वामन केंद्रे अशा अनेक ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शकांसह कंबोडिया, बाली, मॉरिशस या भारतीय उपखंडाबाहेरच्याही अनेक देशांतून तेथील लोकरंगभूमीवर महाभारतातील कहाण्या नाट्यरूपाने सादर होत असतात. खरे तर महाभारतातील प्रत्येक पात्राच्या दृष्टिकोनातून कथानकाची मांडणी करता येते आणि त्या दृष्टिकोनानुसार सादरीकरण, आशय, फोकस वेगवेगळा असू शकतो, इतकी प्रचंड नाट्यमयता आणि शक्‍यता महाभारत या महाकाव्यात आहे. एजिक ही स्वतंत्र दूरचित्रवाणी तर महाभारतावर सतत कार्यक्रम देत असते. 

घटोत्कच म्हणजे कोण

केशभूषा, वेशभूषा, रंगभूषा, नेपथ्यातील वेगळेपण, संगीत व प्रकाशयोजनेचे चमत्कार आणि अर्थातच अभिनय अशा नाटकाच्या सर्व अंगांच्या दृष्टीने महाभारतातील कुठल्याही भागावर, कथानकावर करण्यासारखे खूप काही असते म्हणून नाट्यकर्मींसाठी महाभारत हा एक चिरंतन कुतूहलाचा, आकर्षणाचा विषय राहिलेला आहे. ही गोष्ट नावाप्रमाणेच घटोत्कच केंद्रित असली तरी नाटकाच्या आरंभीच माणसांचे स्वभाव, विचार, विकार, लालसा, वासना, विवेक-अविवेक आदी सर्व पैलूंना स्पर्श करणारी आहे, अशा आशयाचे जे समूहगीत सादर केले जाते त्याप्रमाणे घटोत्कचाप्रमाणेच माणसाचेही आहे. 

महाभारत या महाकाव्यात 

लेखक आशुतोष दिवाण यांच्या लेखनातले या नाटकातील एक वैशिष्ट्य म्हणजे यातील धर्म, भीम, दुर्योधन, कर्ण या सर्वच प्रमुख पात्रांना कधी ना कधी पडलेला आम्ही कशाकरिता ही लढाई लढतो आहोत हा प्रश्‍न. त्याचप्रमाणे महापराक्रमी असलेल्या या सर्व पात्रांसह अभिमन्यू व अन्य योद्ध्यांना वाटलेले मृत्यूचे भय. तद्वतच दिग्दर्शक म्हणून अभिजित झुंजारराव यांची भूमिका किंवा ॲप्रोच. ते म्हणतात, घटोत्कच म्हणजे कोण? तर मत न मांडू शकणारा, सद्‌सदविवेकबुद्धी जागृत ठेवण्याची गरज असतानाही सोयिस्कररीत्या मुका राहणारा, राजकीय, सामाजिक पातळीवर वापरला जाणारा कुणीही म्हणजे घटोत्कच. घटोत्कच असणाऱ्या प्रत्येकाचे रूपांतर माणसात झाले पाहिजे. तर अशी ही या ‘घटोत्कच’ची मांडणी आहे. 

- लेखक : आशुतोष दिवाण 
- दिग्दर्शक : अभिजित झुंजारराव 
- नेपथ्य : प्रदीप पाटील 
- प्रकाश योजना : श्‍याम चव्हाण 
- संगीत : आशुतोष वाघमारे 
- रंगभूषा : रेश्‍मा कदम. 
- वेशभूषा : तृप्ती झुंजारराव. 
कलावंत : राजस पंधे, ऋचिका खैरनार, सरिता माने, रमजान मुलानी, हरीश भिसे, राहुल शिरसाठ, प्राची राठोड, अभिनय तालखेडकर, नीलेश गोसावी, निखिल खाडे, संकेत जाधव, श्रेयसी वैद्य, सायली शिंदे. 
- सादरकर्ते : अभिनय, कल्याण. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT